पत्रकारांनी राबवलेला हा समाजाभिमुख उपक्रम असल्याचे डॉक्टर गिरीश गुणे यांनी सांगितले. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या अंतर्गत हा स्तुत्य उपक्रम राबवला, याबद्दल त्यांनी पत्रकार संघटनेचे कौतुक केले. पत्रकारांच्या बातमीपेक्षा सायकल वाटप हा वेगळा अँगल असून हा अनेकांना समाधान देणारा कार्यक्रम आहे असे मत व्यक्त केले. विविध पक्षातून असे उपक्रम केले जातात मात्र पत्रकार संघातर्फे सायकल वाटप कार्यक्रम घेणे ही कौतुकाची बाब असल्याचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. कोणताही कार्यक्रम करताना अडचणी येतात आणि जो काम करतो त्यालाच अडचणी येतात. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरता ३३ सायकल दिलीत ही सोपी गोष्ट नाही. हे काम खूप मोठे असल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.