देशभरात दिवाळीला उत्साहात सुरुवात झालेली असताना, महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली दिवाळी पहात संकल्पना आता राजधानी दिल्लीत हि रुजू पाहतेय. दिल्लीतील मराठी जन दरवर्षी मी दिल्लीकर च्या माध्यमातून दिवाळी पहाट कार्यक्रम घेतात यंदा या उपक्रमाची दशकपूर्ती मोठ्या धामधुमीत साजरी करण्यात आली. यावेळी डीयू आणि जेएनयूच्या १० जणांच्या चमूने हे १०,००० दिवे लावून १० हजार दिवे उपक्रम राबवला तर दिवाळी पहाटच्या दशकपूर्तीचे स्मरण ठेवणारे चांदीचे नाणे विक्री साठी उपलब्ध करण्यात आले. ‘मी दिल्लीकर’ या दिल्लीकरांचा विविधांगी साहित्याविष्काराच्या संग्राह्य डिजिटल अंकाचे कपिल मिश्रा यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. दिल्लीत महाराष्ट्राच्या पद्धतीने दिवाळी कंदील परंपरा रूजवण्याचा मी दिल्लीकरांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला. यावेळी कार्यक्रम स्थळी बच्चे कंपन्यांकडून रंगरंगोटीची धूम करण्यात आली तसेच दिल्लीतील इंद्रप्रस्थ ढोल ताशा पथकाच्या वादन यावेळी सादर करण्यात आले.