पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणावरून पुण्याचे खासदार आणि केंद्रातील राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर राजू शेट्टी आणि शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जोरदार आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. आता या आरोपांना मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलय. मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण या जमीन व्यवहाराशी संबंधित गोखले बिल्डरच्या भागीदारीतून 11 महिन्यांपूर्वीच बाहेर पडल्याचे पुरावे देत LLP मधून राजीनामा दिल्याची कागदपत्रे सादर केली आहेत. एवढंच नाहीतर आरोप करणाऱ्यांवर मोहोळ यांनी अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. “राजू शेट्टी नूरा कुस्ती खेळतात,” तर “बिळातील उंदीर बाहेर आले,” असं म्हणत त्यांनी माजी आमदार धंगेकरांना लक्ष केलं. आपल्या वरील आरोप फेटाळत मोहोळ यांनी राजू शेट्टींना आव्हान दिल्याने राजू शेट्टी यांनी पुन्हा मोहोळांवर पलटवार करत तुमच्या राजकीय वस्तादांना विचारा माझी कुस्ती कशी असते असं चॅलेंज दिलं सोबतच जर मोहोळांचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर त्यांनी पुढाकार घेऊन हा व्यवहार रद्द करावा असा डाव टाकला आहे.