भोंदू खरात प्रकरण आता केवळ लैंगिक शोषण आणि फसवणुकीपुरतं मर्यादित न राहता मोठ्या आर्थिक गुन्ह्याकडे वळत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एसआयटीच्या तपासात हवाला रॅकेटचा संशय व्यक्त करण्यात आला असून, परदेशात—विशेषतः दुबईपर्यंत—पैशांची देवाण-घेवाण झाल्याचे संकेत मिळत आहेत. तपास यंत्रणांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भोंदू खरात हा काही व्यक्तींचा पैसा बेकायदेशीर मार्गाने विदेशात पाठवण्याचं काम करत होता का, याचा सखोल तपास सुरू आहे. हवाला मार्गाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. जर ED तपासात उतरलं, तर या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि मनी लॉन्डरिंगचे धागेदोरे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. एसआयटीला काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती समोर येत आहे.