Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai : आधी गॅस नंतरच रस्ता; गॅस सिलेंडरसाठी अडवला मुंबई अहमदाबाद महामार्ग

नवी मुंबईच्या विविध ठिकाणी पोलिसांनी अचानक नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 28, 2026 | 07:49 PM
Vasai : आधी गॅस नंतरच रस्ता; गॅस सिलेंडरसाठी अडवला मुंबई अहमदाबाद महामार्ग
Follow Us
Follow Us:

वसई/निलेश महाडीक : आखाती देशात सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा देशभरात जाणवायला लागला. सर्वसामान्य देखील यात भरडले जात असून आता इंधन तुटवडा आणि दरवाढीविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. घरगुती गॅसच्या तीव्र टंचाईमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वसई तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उतरून जोरदार आंदोलन छेडले. हातात रिकामे सिलिंडर घेतला आणि नागरिकांनी थेट रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक रोखली. यावेळी  प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली.

मीरा-भाईंदरमध्ये आगीचे तांडव; 4-5 इमारती आगीच्या विळख्यात; परिवहन मंत्री घटनास्थळी दाखल

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आंदोलनाची तीव्रता स्पष्ट दिसून येते. मोठ्या संख्येने महिला व नागरिक महामार्गावर जमा झाले होते. “गॅस द्या, अन्यथा रास्ता रोको” अशा आक्रमक घोषणांनी परिसर दणाणून गेला. काही आंदोलकांनी रिकामे सिलिंडर रस्त्यावर ठेवून निषेध नोंदवला, तर काहींनी प्रशासनाला थेट जबाबदार धरत संताप व्यक्त केला.गेल्या अनेक दिवसांपासून गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक कुटुंबांना १०-१५ दिवस सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागत असल्याने स्वयंपाकघर बंद पडण्याची वेळ आली आहे. हॉटेल व्यावसायिकांनाही याचा मोठा फटका बसत असून रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

महामार्गावर झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, “आधी गॅस, मगच रस्ता मोकळा” अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतल्याचे दिसून आले.आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की, तातडीने गॅस पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. “आमच्या घरात चुली विझल्या आहेत आणि प्रशासन मात्र आश्वासनांमध्ये गुंतले आहे,” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला.एकूणच, गॅस टंचाईचा प्रश्न आता गंभीर स्वरूप धारण करत असून तो थेट रस्त्यावर उतरलेल्या जनआक्रोशात बदलला आहे. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर अशा आंदोलनांची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाणे पालिकेत ६०० कोटींचा घोटाळा; उच्चस्तरीय चौकशीची आमदार संजय केळकर यांची मागणी

Web Title: Vasai first gas then road mumbai ahmedabad highway blocked for gas cylinders 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Vasai news
  • VASAI POLICE

संबंधित बातम्या

Vasai Virar News : हॉटेल-डेअरींवर कारवाई, मग खाऊगल्ल्यांना मोकळे रान का? FDA च्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह
1

Vasai Virar News : हॉटेल-डेअरींवर कारवाई, मग खाऊगल्ल्यांना मोकळे रान का? FDA च्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Vasai Fake Currency : वसईत मोठा पर्दाफाश, 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त, 30 लाखांत विक्रीचा होता डाव
2

Vasai Fake Currency : वसईत मोठा पर्दाफाश, 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त, 30 लाखांत विक्रीचा होता डाव

Vasai Virar Mangrove Scam : हव्यासापोटी कांदळवनांची कत्तल सुरूच! 200 हून अधिक गुन्हे दाखल, पण तपासावर मोठं प्रश्नचिन्ह
3

Vasai Virar Mangrove Scam : हव्यासापोटी कांदळवनांची कत्तल सुरूच! 200 हून अधिक गुन्हे दाखल, पण तपासावर मोठं प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.