Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : सागरी अध्ययन, क्रीडा विज्ञानात मुंबई विद्यापीठाची झेप; युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत प्रशिक्षणासाठी करार

मुंबई विद्यापीठाने सागरी अध्ययन आणि स्पोर्ट्स सायन्स या दोन महत्त्वपूर्ण व भविष्याभिमुख क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्यांचा विस्तार करत ऑस्ट्रेलियातील यूनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत सामंजस्य करार केला आहे

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 28, 2026 | 06:46 PM
Mumbai News : सागरी अध्ययन, क्रीडा विज्ञानात मुंबई विद्यापीठाची झेप; युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत प्रशिक्षणासाठी करार
Follow Us
Follow Us:
  • सागरी अध्ययन, क्रीडा विज्ञानात मुंबई विद्यापीठाची झेप;
  • युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत प्रशिक्षणासाठी करार
मुंबई :  मुंबई विद्यापीठाने सागरी अध्ययन आणि स्पोर्ट्स सायन्स या दोन महत्त्वपूर्ण व भविष्याभिमुख क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्यांचा विस्तार करत ऑस्ट्रेलियातील यूनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे विशेषतः सागरी अध्ययन क्षेत्रात समुद्र विज्ञान, किनारी परिसंस्था, सागरी जैवविविधता, हवामान बदलाचा किनारी भागांवरील परिणाम तसेच सागरी संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर सखोल आणि परिणामकारक अध्ययन आणि संशोधनाला गती मिळणार आहे. भारताच्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर हे सहकार्य राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावरील सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. स्पोर्ट्स सायन्सच्या क्षेत्रातही या कराराद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खेळाडूंची कार्यक्षमता वाढविणे, डेटा आधारित विश्लेषण, फिटनेस सायन्स, क्रीडा मानसशास्त्र यांसारख्या विषयांवर संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना व क्रीडापटूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, संशोधन आणि तांत्रिक ज्ञानाचा लाभ मिळणार आहे. या सहकार्यांतर्गत सह पदवीचे शिक्षण, विद्यार्थी व प्राध्यापकांची देवाण-घेवाण तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात येणार असून, दोन्ही विद्यापीठांमधील तज्ज्ञांची देवाण-घेवाण होणार आहे.

संशोधन व नवोपक्रमाला मिळणार चालना
मुंबई विद्यापीठाचा हा पुढाकार सागरी अध्ययन आणि स्पोर्ट्स सायन्स क्षेत्रांमध्ये संशोधन व नवोपक्रमाला चालना देणारा ठरणार असून, उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकणी यांनी सांगितले.
तसेच नवी मुंबई येथे प्रस्तावित एज्यु-सिटीमध्ये स्थापन होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबतही विविध प्रकारचे शैक्षणिक सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षण, अत्याधुनिक संशोधन दर्जाचे सुविधा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

औद्योगिक विकास की अधोगतीची वाटचाल; शहरीकरणात घुसमटले पक्षी, ‘या’ दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर

कोण कोण होते उपस्थित?
सामंजस्य कराराप्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, संचालक नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य प्रा. फारुख काझी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साहचर्य व विद्यार्थी सहाय्य केंद्राचे समन्वयक डॉ. सुनील पाटील, सागरी अध्ययन केंद्राच्या संचालिका प्रा. वर्षा केळकर माने, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. मनोज रेड्डी, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. मनोहर माने आदी उपस्थित होते. तर तर युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या वतीने कुलगुरू प्रा. अमित चकमा, प्रा. जेनिफर होंवेल, प्र-कुलगुरू जागतिक सहभाग, प्रा. अॅनेट जॉर्ज, प्रा. सिल्वाना गॉडिएरी, नाशिद चौधरी, ब्रॉडरिक मॉनक्रीफ, प्रणव देसाई आणि हरी पद्मनाभन यांची उपस्थिती होती.

“माघार घ्या, नाहीतर सरकारी रोष सहन करा!” इंडियन मेडिकल असोसिएशन माजी अध्यक्ष व सभासदांनी तयार केलेल्या पॅनलमधील उमेदवारांना धमकी

Web Title: Mumbai universitys leap in marine studies sports science agreement for training with university of western australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • Mumbai News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Mumbai News: सहा खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित! एफडीएच्या विशेष धडक मोहिमेत ३४.८७ लाखांचा गुटखा जप्त
1

Mumbai News: सहा खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित! एफडीएच्या विशेष धडक मोहिमेत ३४.८७ लाखांचा गुटखा जप्त

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ
2

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं
3

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं

मेट्रोसारखी सुरक्षा लोकलमध्ये राबवणे कठीण! प्रशासन सतर्क सीसीटीव्ही वाढवण्यावर भर; आव्हानांवर मात करण्याचा पोलिसांचा भर
4

मेट्रोसारखी सुरक्षा लोकलमध्ये राबवणे कठीण! प्रशासन सतर्क सीसीटीव्ही वाढवण्यावर भर; आव्हानांवर मात करण्याचा पोलिसांचा भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.