सुकेळी खिंडीच्या उतारावरती खैरवाडी स्टाॅपच्या समोर ट्रेलर डिवायर्डरला धडकुन भीषण अपघात झाला. हा अपघात ईतका भयंकर होता की या अपघातात ट्रेलर चालक जागीच ठार झाला. हा अपघात सोम. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोलाड बाजुकडून वाकणच्या दिशेने कंटेनर घेऊन जाणारा ट्रेलर सुकेळी खिंडीच्या उतारावरती आला. त्यानंतर ट्रेलर चालकाचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलर सरळ जाऊन डिवायर्डरला धडकला. याचा वेग इतका मोठा होता की, ट्रेलरवर असलेला कंटेनर १० ते १५ फुट अंतरावर पलटी झाला. त्यामुळे ट्रेलर चालक पवन शिवाजी जाधव हा केबिनमध्येच अडकुन जागीच ठार झाला. सुदैवाने अपघात झाला त्यावेळी दुसरे कोणतेही वाहन तेथुन जात नव्हते त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच वाकण टॅबचे कर्मचारी तसेच ऐनघर ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.