नाशिकरोड भागातील फर्नांडिस वाडी या ठिकाणी रात्री दोन गट आपसात भिडले जुन्या वादातून त्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडलीय. दोन्ही गटाकडून 15 ते 20 राऊंड फायर करण्यात आले आहे विशेष बाब म्हणजे एका गटाकडून कोर्टात बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या घरी देखील दगड फेक व कांचेच्या बाटल्या देखील फेकण्यात आल्या आहे. नाशिकरोड भागात फर्नांडिस वाडी येथे काल रात्री बेद आणि जॉनवाल गँग समोर समोर येउन एकमेकांच्या दिशेने फायरिंग केली. जवळपास पंधरा ते वीस राउंड दोन्ही गटाकडून बाहेर करण्यात आल्याच अनेक नागरिकांनी सांगितल आहे. तर घटनास्थळावरून आठ राऊंड फायर केलेले काडतूस मिळाले आहे. तसेच त्या ठिकाणी राहणाऱ्या महिला वकिलांच्या घरावर देखील दगडफेक आणि बाटल्या फेकण्यात आल्या. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.