Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : उन्हाळ्यात भासणार १०७५ गावांना टंचाई, पाण्यासाठी टँकरवरच राहणार भर

water Issue : उन्हाळ्यात गावांना पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता आहे. कारण अनियमित पाऊस, वाढते तापमान, भूजल पातळी खालावणे आणि पाण्याचा अपव्यय ही मुख्य कारणे आहेत. ज्यामुळे महिला व मुलींना दूरवरून पाणी आणावे लागते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 12, 2026 | 03:01 PM
उन्हाळ्यात भासणार १०७५ गावांना टंचाई, पाण्यासाठी टँकरवरच राहणार भर

उन्हाळ्यात भासणार १०७५ गावांना टंचाई, पाण्यासाठी टँकरवरच राहणार भर

Follow Us
Close
Follow Us:

Nashik Water Issue News Marathi: नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुमारे ७७ टक्के जलसाठा उपलब्ध असतांना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने यंदा ४२३ गावे व ६५२ वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसणार असल्याचा अंदाज बांधून सुमारे ७ कोटी ३८ लाखाचा आराखडा सादर केला आहे. यंदाही प्रशासनाचा टँकरवरच भर देण्यात आला असून, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा प्रशासनाकडे दाखल झालेला संभाव्य ‘टंचाई निवारण आराखडा’ अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. जिल्ह्यातील धरणांचा साठा आणि भूजल पातळीचा विचार करून यावर्षीचा आराखडा तयार करण्यात आला आहे.या आराखड्यानुसार जिल्ह्यात ४२३ गावे आणि ६५२ वाड्यांवर दुष्काळाची शक्यता गृहित धरण्यात आली आहे. टंचाई निवारणासाठी ७ कोटी ३८ लाख २६ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, येवला, सिन्नर आणि चांदवड यांसारख्या कायम टंचाईग्रस्त तालुक्यांवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पाणीटंचाई भासणाऱ्या गावांमध्ये खासगी विहिरी अधिग्रहित करून गावकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यास किती टँकर लागतील, याचे तालुकानिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

Nashik News : रुग्णांच्या जीवाशी खेळ! शासकीय आयुर्वेदिक दवाखान्यात कालबाह्य औषधे 

गेल्या वर्षी जवळपास सात ते आठ महिने पाऊस सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने पहिल्या टप्प्यातील तीन महिन्यात कुठेही पाणीटंचाई भासणार नसल्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन १६० गावे आणि ६४ वाड्यांवर खासगी विहिरी अधिग्रहित कराव्या लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या गावे आणि वाड्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी १६२ टैंकर लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. प्रशासनाने खासगी विहिरी अधिग्रहित करण्यावर भर दिला असून, त्यामुळे परिसरात पाणीपुरवठा करणे सोयीचे होणार आहे.

दोन महिन्यात २५ टक्के पातळी खालावली

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच जिल्ह्यातील धरणांतील जलसाठा पटण्यास सुरूवात झाली असून, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापुर धरणात ६९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. आगामी काळात उन्हाचा तडाखा व पाण्याचा वापर वाढल्यास धरणातील पाणी खालावण्यास झपाट्‌याने सुरूवात होणार आहे. यंदा पावसाळ्यात वरूण राजाचे मे महिन्यापासूनच मान्सूनपुर्व बरसण्यास सुरूवात झाली. पावसाळ्यातील चारही महिने मुक्काम ठोकून ऑक्टोंबर, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपली हजेरी ठेवली. परिणामी सप्टेंबरमध्येच जिल्ह्यातील धरणे, तलाव, जलाशये काठोकाठ भरल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करावा लागला. सलग तीन महिन्यांहून अधिक काळ नद्या, नालेही दुथडी भरून वाहिले. शिवाय भुजल पातळीही वाढली व विहीरींही काठोकाठ भरल्या.

त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात येत. असले तरी, रब्बीचे आवर्तन, विविध नळपाणी पुरवठा योजनांसाठी करावे लागलेले वाढीव आरक्षणाचा विचार करता, गेल्या दोन महिन्यात धरणसाठ्यात २५ टक्के कमतरता आली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये ५३ हजार ६६३ दशलक्ष घनफूट म्हणजेच ७५.९९ टक्के पाणी सध्या शिल्लक आहे. यात शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापुर धरणात ६९ टक्के तर गंगापुर धरण समुहात ७७.८४ टक्के इतका जलसाठा आहे. पालखेड, भोजापूर ही धरणे पंधरा टक्क्यांवर आली आहेत. तर कडव्यात ५७ टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे.

विहिरीही अधिग्रहीत करणार

टंचाई आराखड्‌यात दुसऱ्या टप्प्यात महणजेच जानेवारी ते मार्च यादरम्यान ५१ गावे आणि १४ वाड्यांवर खासगी विहीर अधिग्रहित करण्यात येण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे तर ७९ गावे आणि १३० वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, असा अंदाज असून, यासाठी एकूण १ कोटी ३९ लाख ७९ हजार रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.

पाऊस लांबल्यास विचार करावा लागेल

सध्या धरणातील पाण्यावर सिंचन व पिण्यासाठीचे आरक्षण असून, साधारणतः उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर पाण्याची मागणी वाढते. त्याचा विचार करून जुन महिना अखेरीस पर्यंत तरी पाण्याची टंचाई भासणार नाही मात्र पाऊस लांबल्यास विचार करावा लागेल असे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांचे म्हणणे आहे.

Nagpur: आगीत पेपर कंपनी खाक; सात तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाले नियंत्रण

Web Title: 1075 villages to face shortage in summer residents will have to rely on water tanks for supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • Water Shortage

संबंधित बातम्या

अजितदादांची प्रचंड आठवण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा न्याय देऊन गेले; अमोल बालवडकर भावूक
1

अजितदादांची प्रचंड आठवण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा न्याय देऊन गेले; अमोल बालवडकर भावूक

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
2

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

शेतकरी घेणार इस्राईलमध्ये आधुनिक शेतीचे धडे! १० दिवसांचा विशेष अभ्यास दौरा; कृषी अधिकाऱ्यांसह पथक रवाना
3

शेतकरी घेणार इस्राईलमध्ये आधुनिक शेतीचे धडे! १० दिवसांचा विशेष अभ्यास दौरा; कृषी अधिकाऱ्यांसह पथक रवाना

Dharashiv News: कंत्राटी कर्मचाऱ्यांची लाखोंची आर्थिक लूट, आरोग्य विभागात अमानवीय पिळवणूक, दोषींवर कारवाईची मागणी
4

Dharashiv News: कंत्राटी कर्मचाऱ्यांची लाखोंची आर्थिक लूट, आरोग्य विभागात अमानवीय पिळवणूक, दोषींवर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.