कोल्हापूर जिल्ह्यातील गावठाण वाढीसाठी शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.. जिल्ह्यातील प्रत्येक गावासह शहरातील नगरपालिका, महापालिकेच्या मूळ हद्दीपासून २०० मीटरचे रेखांकन पूर्ण करून त्याबाबतची स्पष्ठता १ नोव्हेंबरपूर्वी द्यावी असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकरांनी भूमिअभिलेख विभागाला दिलेतं..यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गावठाण वाढीचा अडसर दूर होवून नागरिकांची बांधकाम परवान्यांसह इतर किचकट अडचणी पासून सुटका होणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे..शिवाय कमी गुंठेवारीसाठी अडचण ठरणारा तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आला आहे.. त्यामुळे याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयाची जिल्ह्यात तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्याचं आबिटकरांनी सांगितलं..तसचं कमी गुंठेवारीच्या खरेद- विक्री दस्त नोंदणी प्रक्रियेत अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक दिरंगाई केल्यास थेट जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री कार्यालयाशी संपर्क साधवा..त्यांच्यावर कारवाई केली जाईल असही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे