Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी महत्वाचं पाऊल; कृष्णा कारखान्याचा मोलाचा प्रयत्न

पोटासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करत ऊसतोडीसाठी येणाऱ्या मजुरांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सामाजिक जाणीवेचा ठोस प्रत्यय दिला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 26, 2026 | 07:52 PM
Kolhapur News : ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी महत्वाचं पाऊल; कृष्णा कारखान्याचा मोलाचा प्रयत्न
Follow Us
Close
Follow Us:
  • ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी महत्वाचं पाऊल
  • कृष्णा कारखान्याचा मोलाचा प्रयत्न
कराड : पोटासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करत ऊसतोडीसाठी येणाऱ्या मजुरांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सामाजिक जाणीवेचा ठोस प्रत्यय दिला आहे. कारखान्याच्या साखर शाळेतील तब्बल २६५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून कारखान्याने शिक्षणप्रवाह टिकवून ठेवण्याचा मोलाचा प्रयत्न केला आहे.ऊसतोड मजुरांना सहा महिने कारखाना परिसरात वास्तव्य करावे लागते. त्यामुळे त्यांच्या मुलांना गावातील शाळांपासून दूर राहावे लागून शिक्षणात मोठा खंड पडतो. अनेक मुले या कारणामुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाबाहेर फेकली जातात. ही गंभीर बाब लक्षात घेऊन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना परिसरात चार साखर शाळा सुरू केल्या आहेत.

Ichalkaranji Mayor : वस्त्रनगरीचा पहिला महापौर कोण? अनुभवी सदस्यांसह नवख्या सदस्यांत रस्सीखेच

या शाळांमुळे स्थलांतरित मजुरांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात बोलताना कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार म्हणाले, बीड, जालना, धाराशिव, परभणी, सोलापूर आदी जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने ऊसतोड मजूर कृष्णा कारखान्यात दाखल झाले आहेत. या मजुरांचे व त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान उंचावण्यासाठी चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. आरोग्य शिबिरे, मूलभूत सुविधा आणि आता विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत अशा उपक्रमांतून कारखाना आपली सामाजिक बांधिलकी जपत आहे.

विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, पेन, शालेय साहित्य वाटप

विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय साहित्यात पाटी, पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकला वह्या, तसेच गोष्टींच्या पुस्तकांचा समावेश होता. साखर शाळांच्या यशस्वी संचालनासाठी जनार्थ सेवा संस्थेचे सहकार्य लाभत असून, या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. या प्रसंगी जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, शिक्षिका राधिका लोखंडे, स्वाती चोपडे, मानसी चोपडे, मयुरी वडकर, अमृता धर्मे, अश्विनी गायकवाड, दीपाली हुलवान यांच्यासह शेती व उसविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kolhapur ZP Election 2026: गडहिंग्लजमध्ये महायुतीत सावळा गोंधळ राष्ट्रवादी-भाजपा आमने-सामने; महाविकास आघाडी बॅकफूटवर

Web Title: Kolhapur news important step for education for children of sugarcane workers valuable effort of krishna factory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • education news
  • kolhapur
  • Marathi News

संबंधित बातम्या

प्रजासत्ताक दिनी रंगले कोकणचे वैभव! छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील संचलनात ‘कोकण पर्यटन’ चित्ररथाने वेधले लक्ष
1

प्रजासत्ताक दिनी रंगले कोकणचे वैभव! छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील संचलनात ‘कोकण पर्यटन’ चित्ररथाने वेधले लक्ष

Virar :  पोलिसांच्या पाठपुराव्याला यश;  25 लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती
2

Virar : पोलिसांच्या पाठपुराव्याला यश; 25 लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Ahilyanagar News: ‘बेटी बचाव’ फक्त फक्त घोषणा ठरणार का? छेडछाडीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण
3

Ahilyanagar News: ‘बेटी बचाव’ फक्त फक्त घोषणा ठरणार का? छेडछाडीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण

Bigg Boss Marathi 6: तिसऱ्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात येणार वाइल्ड कार्ड? प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
4

Bigg Boss Marathi 6: तिसऱ्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात येणार वाइल्ड कार्ड? प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.