कोल्हापूर जिल्ह्यात शिंदे समितीने शोधलेल्या कुणबी नोंदींमध्ये गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. मोडी लिपीतील नोंदी मराठीत करताना गावांची नावेच बदलल्याचा धक्कादायक प्रकार स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने उघड केला आहे. करवीर तालुक्यातील गिरगाव गावाच्या नावाने संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली यादी प्रत्यक्षात कुर्डू गावाची असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गिरगावच्या नोंदी कुठे गेल्या आणि कुर्डू गावालादेखील याचा लाभ का मिळाला नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे. जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.