कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे विवाहितेच्या कथित छळाची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैष्णवी धैर्यशील मगदूम यांनी पती, सासू आणि दीरावर माहेरून वारंवार पैसे व दागिने आणण्यासाठी दबाव टाकणे, मुलगी झाल्यानंतर मानसिक व शारीरिक छळ करणे आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या मारहाणीत त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून शस्त्रक्रिया करावी लागली. या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजारामपुरीतील अस्मिता काटकर आत्महत्येची घटना ताजी असतानाच ही घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. .