Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Firing Case: कोल्हापुर हादरलं! दिवसाढवळ्या भर चौकात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?

Kolhapur Firing Case News: कोल्हापूरच्या फुलेवाडी रिंग रोडवरील नाना पाटील चौकात भाजप कार्यकर्ता आणि मोक्का गुन्हेगार सूरज साखरे याच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. २ गोळ्या लागल्याने साखरे गंभीर जखमी असून शहरात तणाव आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 16, 2026 | 07:08 PM
Kolhapur Firing Case (Photro Credit- X)

Kolhapur Firing Case (Photro Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • कोल्हापुरात थरारक गोळीबार!
  • नाना पाटील चौकात भाजप कार्यकर्त्यावर भरदिवसा गोळ्या झाडल्या
  • शहरात तणाव
कोल्हापूर: कोल्हापूर शहर गुरुवारी एका थरारक आणि अत्यंत गंभीर गोळीबाराच्या घटनेने हादरून गेले आहे. शहरातील फुलेवाडी रिंग रोडवरील नाना पाटील चौकाजवळ दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भाजप कार्यकर्ता आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सूरज हणमंत साखरे याच्यावर अज्ञातांनी भरदिवसा गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यात साखरे गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात आणि फुलेवाडी रिंग रोड परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भरचौकात तीन राऊंड फायर; हल्लेखोर पसार

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज साखरे हा आपल्या वैयक्तिक कामासाठी फुलेवाडी रिंग रोड परिसरातून जात होता. याच दरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याला गाठले. काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी साखरेच्या दिशेने पिस्तुलातून तीन राऊंड गोळीबार केला. यातील दोन गोळ्या साखरेला लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. भरचौकात अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच पळापळ आणि खळबळ उडाली. या गोंधळाचा फायदा घेऊन हल्लेखोर दुचाकीवरून घटनास्थळावरून वेगाने पसार झाले. जखमी साखरेला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

खाजगी सावकारी की जुने वैर? पोलीस तपास सुरू

सूरज साखरे याच्यावर झालेल्या या हल्ल्यामागे जुने व्यावसायिक वैर किंवा खाजगी सावकारीच्या पैशांच्या देवाणघेवाणीचा वाद असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अनधिकृत कर्ज वाटप आणि पैशांच्या वसुलीवरून त्याचे कोल्हापुरात अनेक शत्रू निर्माण झाले होते. या वादातूनच पूर्ववैमनस्यातून हा कट रचण्यात आला का, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.

Thane Crime News: मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; शीर आणि दोन्ही हात धडापासून केले वेगळे, नंतर…

भाजप कार्यकर्ता असलेल्या सूरज साखरेची काय आहे पार्श्वभूमी?

गोळीबार झालेला सूरज साखरे हा राजकीय पक्षात कार्यरत असला तरी त्याची मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. बेकायदेशीर खाजगी सावकारी, खंडणी वसुली आणि अपहरण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा थेट सहभाग होता. साखरे आणि त्याच्या गुन्हेगारी टोळीवर कोल्हापूर पोलिसांनी यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच ‘मोक्का’ अंतर्गत कडक कारवाई केली होती.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, करवीर पोलीस आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज युद्धपातळीवर गोळा करण्याचे काम सुरू आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी कोल्हापूरच्या महत्त्वाच्या नाक्यांवर आणि चौकांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, भरदिवसा आणि गजबजलेल्या भागात झालेल्या या गोळीबारामुळे कोल्हापुरातील गुन्हेगारी आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Pune Crime: पुण्यात अजब चोरी! कोंबड्यांनाही नाही सुरक्षा; टेम्पोतून 800 जिवंत कोंबड्या लंपास

Web Title: Bjp worker and mcoca accused suraj sakhre injured in kolhapur firing marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • BJP
  • crime news
  • firing
  • Firing News
  • kolhapur

संबंधित बातम्या

बहिणीची छेड काढल्याचा राग, बेदम मारहाण करुन तरुणाचा खून; वाकडमधील घटनेनं खळबळ
1

बहिणीची छेड काढल्याचा राग, बेदम मारहाण करुन तरुणाचा खून; वाकडमधील घटनेनं खळबळ

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…
2

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…

पाटण्यात धक्कादायक घटना; मुलाच्या नशेच्या सवयीवरून वाद, जळालेल्या अवस्थेत सापडला आईचा मृतदेह
3

पाटण्यात धक्कादायक घटना; मुलाच्या नशेच्या सवयीवरून वाद, जळालेल्या अवस्थेत सापडला आईचा मृतदेह

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर
4

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.