कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीनं ज्येष्ठ नागरिकांसाठी ऐतिहासिक व नाविन्यपूर्ण योजना जाहीर केली आहे. “आमचे आई-वडील, आमची जबाबदारी” या योजनेअंतर्गत गावातील 65 वर्षांवरील निराधार ज्येष्ठ नागरिकांना ब्लड प्रेशर व शुगरची औषधे प्रतिमाहिना आयुष्यभर मोफत देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त या योजनेची सुरुवात झाली असून ग्रामनिधीतून होणाऱ्या खर्चामुळे गावातील 100 ते 125 नागरिकांना याचा थेट फायदा होणार आहे. अशा प्रकारची योजना राबवणारी माणगाव ही देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. यापूर्वीही माणगाव ग्रामपंचायतीने कन्यारत्न योजना, माहेरची साडी, लेक लाडकी माझ्या गावची यांसारखे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.