शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवस्थान समितीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.त्यामुळे मंदिर स्वच्छतेच्या कामांना आता वेग आलायं..साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या दिमाखात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो.. पुढच्या आठवड्यात आई अंबाबाईच्या नवरात्र उत्सावास सुरुवात प्रार्थना होणार आहे.. याच पार्श्वभूमीवर मंदिरात स्वच्छता आणि रंगरंगोटीच्या कामांची लगबग सुरू आहे..श्री अंबाबाई मंदिरावरील शिखरांची स्वच्छता पूर्ण झाली असून आता रंगरंगोटी करण्यास सुरुवात झाली आहे.. जवळपास 20 पेक्षा अधिक कामगारांकडून रंगरंगोटी सुरू आहे.. त्यासोबतच गरुड मंडप आणि नगारखाना नूतनीकरणाच्या कामानं गती घेतली आहे..शिवाय यंदा भाविकांची गर्दी लक्षात घेता AI च्या माध्यमातून सीसीटीव्ही द्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.