कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला सरकारने राज्य महोत्सव दर्जा दिला आहे. मात्र दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी सरकारने निधी दिला नसल्याने शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालायं. कोल्हापूरातील शाही दसऱ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या दसरा महोत्सवास सरकारने किमान दोन कोटींचा निधी द्यावा अशी मागणी शिवसैनिकांनी केलीये. याबाबतच निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलंय. यावेळी सरकारने तातडीने कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवास तात्काळ निधी द्यावा अन्यथा पालकमंत्री प्रकाश आबिटकरांना घेराव घालण्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिलायं.