कोल्हापूरातील मार्केट यार्ड परिसरातील एका हाॅलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा झाला. त्यामुळे उपमुख्यमंत्री येण्याच्या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून दूरावस्था असलेल्या रस्त्यावर डांबरीकरण झालं. मात्र एका दिवसातचं डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता उखडला. कोल्हापूरातील खराब रस्त्यांमुळं नागरिक अक्षरशः हैराण झाले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरकरांना खड्डेमय रस्त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे..यातच आता काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेला नवीन रस्ता काही तासातच उखडल्याच समोर आलंय.त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारा विरोधात कोल्हापूरांनी संताप व्यक्त केलायं.काल बुधवारी कोल्हापूरातील मार्केट यार्ड परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा पार पडला.एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय असलेल्या रस्त्यावर डांबर पडलं.. परंतु एका दिवसातच डांबरीकरण केलेला रस्ता उखडला असून या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडल्याचं समोर आहे. त्यामुळे कोल्हापुरातील रस्त्याच्या कामांच्या दर्जावर मोठ प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून याची चौकशी करण्याची मागणी कोल्हापूरकरांनी केली आहे.