Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News:शेवटी पैसा शिक्षणापेक्षा वरचढ ठरला! शिक्षणाची साथ सोडत मुलांकडून उसतोडीचे कामे हाती

नेवासेत शिक्षण अर्ध्यावर सोडत ऊसतोड मजुरांची मुलं उसाच्या शेतीत काम करत आहे. या समस्येवर आता शिक्षण विभाग काय उपाययोजना करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 06, 2025 | 06:54 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • शिक्षणाची साथ सोडत मुलांकडून उसतोडीचे कामे हाती
  • पालक ऊसतोडीसाठी दूरवर जात असल्याने मुलेही सोबत जावे लागतात
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर ऊसतोडीसाठी मोठ्या प्रमाणात मजूर स्थलांतरित झाले आहेत. या स्थलांतराचा सर्वाधिक परिणाम त्यांच्या मुलांवर होत असून, अनेक विद्यार्थ्यांचे हक्काचे शिक्षण अर्ध्यावर थांबले आहे. पालक ऊसतोडीसाठी दूरवर जात असल्याने मुलेही सोबत जावे लागतात आणि उसाच्या शेतातच कामात मदत करताना दिसतात. या मुलांचे शिक्षण पूर्णपणे विस्कळीत झाले असून, शिक्षण विभाग या विद्यार्थ्यांसाठी कोणती उपाययोजना करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थलांतरित मजुरांसोबत मुलांचेही उसाच्या शेतीत वास्तव्य

अहिल्यानगर व आसपासच्या भागातील साखर कारखान्यांमध्ये गळीत हंगाम सुरू झाल्याने विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा या प्रदेशांतील अनेक कुटुंबे रोजगारासाठी ऊसतोडीला येत आहेत. नेवासे तालुक्यातील गेवराई शिवारात ऊसतोड कामगारांच्या झोपड्यांमध्ये १०–१२ अल्पवयीन मुले-मुली पालकांसोबत वास्तव्यास आहेत. गावात त्यांचे रक्षण करणारा कोणी नसल्याने पालक मुलांना सोबत घेऊनच ऊसतोडीला येतात.

Ahilyanagr News: जमीन विकलेलीच नाही! जैन मंदिराची जागा हडपल्याच्या आरोपावर अध्यक्ष मुठा यांचे स्पष्टीकरण

ही मुले शिक्षण सोडून लहान भावंडांची काळजी घेणे, स्वयंपाक, शेतीतील कामात पालकांना मदत आणि अशी अनेक कामे करत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.

उचल फेडण्यासाठी मजुरी, शिक्षणावर घाला

पेरणीसाठी, मुलांचे लग्न किंवा इतर खर्चासाठी मुकादमांकडून घेतलेली उचल फेडणे, तसेच पोटापाण्याची खात्री करण्यासाठी अनेक मजुरांना ऊसतोडीवर अवलंबून राहावे लागते. ‘नवराष्ट्र’शी बोलताना काही मजुरांनी सांगितले की, परिस्थितीमुळे मुलांना शिक्षण सोडून ऊसतोडीसाठी आणण्याशिवाय पर्याय नसतो.

साखर शाळा गेल्या १०–१२ वर्षांपासून बंद

स्थलांतरित मजुरांच्या मुलांना शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून शासनाने साखर कारखान्यांना साखर शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र गेल्या १०–१२ वर्षांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील एकही साखर शाळा सुरू नाही. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण पूर्णपणे खंडित झाले असून, शासनाने तातडीने साखर शाळा पुन्हा सुरू कराव्यात किंवा तात्पुरती शिक्षणव्यवस्था उभी करावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

मोहोळमध्ये ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र लढणार; कार्यकर्ता मेळाव्यात बड्या नेत्याचा निर्धार

मुलांचे आणि पालकांचे अनुभव

“शिकावं वाटतं, मोठा अधिकारी व्हावंसंही वाटतं… पण माय-बापाबरोबर ऊसतोडीला यावं लागतं. घरी कोणी नसतं. ऊसतोड संपल्यावर गावाकडे गेलो की पुन्हा शाळेत जाईन.” – शुभम अर्जुन जाधव, आंबेवडगाव (ता. पाचोरा)

“पोरांचं शिक्षण व्हावं असं वाटतं, पण घरची परिस्थिती बिकट. पोटासाठी पोरांना घेऊन ऊसतोडीसाठी यावं लागतं. जवळच शिक्षणाची सोय झाली तर पोरांना तरी शाळा मिळेल.” – अर्जुन जाधव, (शुभमचे वडील) ऊसतोड कामगार

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण का खंडित होते?

    Ans: ऊसतोड हंगामात संपूर्ण कुटुंब स्थलांतरित होत असल्याने मुलांना पालकांसोबत फडात राहावे लागते. गावात सांभाळ करणारा कोणी नसल्याने आणि कारखाना कार्यक्षेत्रात शिक्षणाची सोय नसल्याने या मुलांचे नियमित शिक्षण खंडित होते.

  • Que: 2) साखर शाळा काय असते आणि त्या बंद का आहेत?

    Ans: साखर शाळा म्हणजे ऊसतोडीच्या ठिकाणी स्थलांतरित मुलांसाठी तयार करण्यात आलेली तात्पुरती शाळा. शासनाने या शाळा सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर शाळा गेल्या १०–१२ वर्षांपासून विविध कारणांमुळे बंद आहेत.

  • Que: 3) ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी कोणती उपाययोजना होऊ शकते?

    Ans: साखर शाळा पुन्हा सुरू करणे, मोबाईल शाळा/तात्पुरत्या वर्गाची व्यवस्था करणे, बालसंगोपन केंद्रे उघडणे, तसेच योग्य देखरेखीसाठी शिक्षण विभागाकडून विशेष पथके तयार करणे—या उपाययोजनांमुळे स्थलांतरित मुलांचे शिक्षण वंचित राहणार नाही.

Web Title: Ahilyanagar news children started working in sugarcane farms stopped their studies due to low income

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • Sugarcane Farmers

संबंधित बातम्या

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन
1

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी
2

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !
3

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ
4

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.