लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. या अवकाळी पावसाचा फळ भाज्या आणि पालेभाज्यांना तडाखा बसलाय. लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ येथील एका शेतकऱ्याच्या तीन एकरातील कांदा पिकाचे अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर रेनापुर तालुक्यातील रामवाडी येथील एका शेतकऱ्याच्या साडेचार एकरातील कोथिंबीरीला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय.. अवकाळीमुळे हातचे पीक गेल्याने शेतकऱ्यांचे किमान तीन ते चार लाखांचे नुकसान झाले असून, यामुळे शेतकरी अडचणीत आलेत. दरम्यान, शिरूर अनंतपाळ येथील पिकांच्या नुकसानीची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.