Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Zilla Parishad: झेडपीमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक मुसंडी; विलासराव देशमुखांच्या विचारांवर नव्या पर्वाची सुरुवात

लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने दणदणीत यश संपादन करत जिल्ह्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विलासराव देशमुख यांच्या विचारांना मतदारांनी पाठिंबा दिला.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 11, 2026 | 01:50 PM
Latur Zilla Parishad: झेडपीमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक मुसंडी; विलासराव देशमुखांच्या विचारांवर नव्या पर्वाची सुरुवात

Latur Zilla Parishad: झेडपीमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक मुसंडी; विलासराव देशमुखांच्या विचारांवर नव्या पर्वाची सुरुवात

Follow Us
Follow Us:
  • लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची घोडदौड
  • देशमुख कुटुंबाच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची पुनर्स्थापना
  • कार्यकर्त्यांचा जल्लोष, बाभळगावात झाले शक्तिप्रदर्शन
 

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने दणदणीत यश संपादन करत जिल्ह्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विकासाची परंपरा आणि लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विचारांवर मतदारांनी शिक्कामोर्तब करत काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. जिल्हाभरातील अनेक गट आणि गणांमध्ये काँग्रेसने आघाडी घेत बहुमताच्या जवळ जाणारी भक्कम कामगिरी केली आहे. निवडणूक निकाल स्पष्ट होताच जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विजयी उमेदवार आणि कार्यकत्यांनी जल्लोष साजरा करत ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळत चाभळगावच्या दिशेने कूच केली.

Latur Municipal Corporation: लातूर महापालिकेत काँग्रेसचा झेंडा; महापौर जयश्री सोनकांबळेंचा पदभार स्वीकार

या निवडणुकीत काँग्रेसने संघटनात्मक बळ, स्थानिक पातळीवरील जनसंपर्क आणि विकासकामांच्या आधारे मतदारांचा विश्वास जिंकण्यात यश मिळवले. अनेक ठिकाणी काँग्रेस उमेदवारांनी प्रतिस्पध्र्थ्यांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला असल्याचे चित्र दिसून आले. या निकालामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये काँग्रेसचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.

विजयी उमेदवारांनी सर्वप्रथम लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श ठेवून सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. विलासराव देशमुख यांनी सुरू केलेल्या विकासाभिमुख धोरणांमुळे जिल्ह्याची ओळख राज्यभर निर्माण झाली असून त्याच परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारण्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद व पंचायत समिती पातळीवर काँग्रेसला मिळालेल्या या यशामुळे आगामी काळात जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि शेतकरी हिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेसचे नवनिर्वाचित सदस्य पुढाकार घेतील. असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Latur Crime News: लातूरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन सराईत चोरटे अटकेत

जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या महाराणा प्रतापनगर, पांखरसांगवी, काटगाव, हरंगुळ बु., साकोळ, तांदुळजा यांसह विविध भागांतील विजयी उमेदवारांनी बाभळगाव येथे एकत्र येत विजयाचा आनंद साजरा केला. बाभळगाव येथील निवासस्थानी आ. अमित देशमुख, माजी आ. धीरज देशमुख तसेच विलास साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशाली देशमुख यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकत्यांनी जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. मतदारांनी काँग्रेसवर
दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि शेती विकासासाठी प्रभावी काम करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित सदस्यांनी दिले.

Web Title: Congress wins resounding victory in latur re establishes dominance in zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Amit Deshmukh
  • Congress
  • Latur
  • Zilla Parishad Election 2026

संबंधित बातम्या

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात
1

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात

चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
2

चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी घेतली विशाल पाटलांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा
3

सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी घेतली विशाल पाटलांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा

Latur News : दिड लाखासाठी जामीन राहिलेल्या शेतकऱ्याची तब्बल सव्वा कोटीची जमीन हडपली!
4

Latur News : दिड लाखासाठी जामीन राहिलेल्या शेतकऱ्याची तब्बल सव्वा कोटीची जमीन हडपली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.