कल्याण-कल्याणमधील अजमेरा हाईटस या इमारतीतील मराठी बांधवांना मारहाण प्रकरण सध्या दिवसेंदिवस चिघळत जात असल्याचं दिसून येत आहे.
मराठी तरुणावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी आज मुख्य आराेपी अखिलेश शुक्ला याच्यासह सहा आरोपींना खडकपाडा पोलिसांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या सहा आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणावर ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहे. त्यामुळे आता मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद पेटला आहे.याच पार्श्वभूमीवर वकील हरिष सरोदे यांनी माध्यमांना मुलाखत दिली आहे. सरोेदे म्हणाले, भाषावाद हा राज्याराज्यात केल्या जाणाऱ्या राजकारणामुळे या घटना घडत आहेत त्यामुळे हा भाषावाद संपवण्यासाठी सरकारने ठोस पाऊलं उचलायला पाहिजे असल्याचं मत सरोदे यांनी व्यक्त केलं आहे.