यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती–आघाड्यांचे चित्र अजूनही अस्पष्ट असताना, शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजपने अनपेक्षित पाऊल उचलत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबांना तिकीट नाकारत, भाजपने थेट पक्षनिष्ठ कार्यकर्त्यास संधी देण्याचा निर्णय घेतला असून, रत्नमाला फलके यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली आहे. फलके या अनेक वर्षांपासून आमदार मोनिका राजळे यांच्या निकटवर्तीय असून, सामाजिक संस्थांमार्फत तसेच सरकारी योजनांचे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत शहरात सक्रिय आहेत. त्यांच्या उमेदवारीने पारंपरिक राजकीय घराण्यांना मोठा धक्का बसला असून, शेवगावमधील राजकीय समीकरणे हलू लागली आहेत.