
राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्याचे भाजपा जिल्हाध्यक्षांकडून समर्थन
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बंटी जहागिरदारबाबत केलेले वक्तव्य पूर्णपणे योग्य असून, केवळ अनावधानाने जंगली महाराज रोड बॉम्बस्फोटाऐवजी जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा उल्लेख झाला, असेही दिनकर यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेचे समर्थन करत भाजप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले.
PUNE NEWS : प्रभाग 25 मध्ये भाजपाचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’: मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा निश्चय
श्रीरामपूर भाजपाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष बाबासाहेब चेडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, माजी तालुकाध्यक्ष दिपक पटारे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, नगरसेविका वैशाली चव्हाण, नगरसेवक दिपक चव्हाण, रवी पाटील, संजय गांगड, अर्जुन दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, माजी नगरसेवक राजेश अलघ, तिलक डुंगरवाल, महेंद्र पटारे, पूजा चव्हाण, केतन खोरे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी तालुकाध्यक्ष दिपक पटारे म्हणाले की, पालकमंत्री विखे यांनी शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात संपूर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्याच्या स्पष्ट सूचना पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. याचा अर्थ भाजपा कोणत्याही एका समुदायाच्या विरोधात नसून, सर्व गुन्हेगारांच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला श्रीरामपूरसह जिल्हा भाजपाचे पूर्ण समर्थन आहे.
दरम्यान, बंटी जहागिरदारच्या अंत्यविधीस मोठ्या प्रमाणावर जमाव जमल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पालकमंत्र्यांनी गुन्हेगारांविरोधात कडक कारवाईचे निर्देश दिले असून संपूर्ण भाजपा नागरिकांच्या पाठीशी उभी आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे संजय फंड यांनी सांगितले.
नितीन दिनकर यांनी आरोप केला की, मयत बंटी जहागिरदारचा भाऊ आणि नगरसेवक रईस जहागिरदार यांनी पत्रकार परिषद घेऊन खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र बंटीवरील दहशतवादाचा डाग अशा प्रयत्नांनी पुसला जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी बंटीवर यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादी सादर केली. तसेच पुण्यातील जंगली महाराज रोड बॉम्बस्फोट प्रकरणातील एफआयआरची प्रतही पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.
Mahesh Manjrekar: “मुंबईकर म्हणून मला लाज वाटते”, महेश मांजरेकरांनी व्यक्त केली तीव्र खंत
जंगली महाराज रोड साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील वॉन्टेड आरोपी रियाज भटकल हा इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर असल्याचे सांगण्यात आले. याच प्रकरणातील दुसरा आरोपी फैयाज कागजी (बीड) असून अहमद उर्फ झाअबुर रहेमान जलाल हा पाकिस्तानचा अतिरेकी आहे.
या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात बंटी जहागिरदार हा आठ नंबरचा आरोपी असून, त्याने देशी बनावटीचे पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसे पुरविल्याने त्याला अटक करण्यात आली होती, अशी माहिती नितीन दिनकर यांनी दिली.