मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत नव्याने उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा एकदा गंभीर अपघात घडल्याने कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे काम ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीला देण्यात आले असून, कंपनीच्या मनमानी आणि निष्काळजी कारभारामुळे कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे गंभीर आरोप होत आहेत. घोडदेव गावात सुरू असलेल्या या पाण्याच्या टाकीच्या बांधकामादरम्यान अवघ्या सहा महिन्यांपूर्वी मोठी दुर्घटना घडली होती. कॉलमसाठी वापरण्यात आलेले लोखंडी पत्रे अचानक रस्त्यावर कोसळली होती. तसेच टाकीच्या बाजूला असलेली संरक्षण भिंतही पडली होती. या घटनेवेळी कामगारांकडे कोणतीही आवश्यक सुरक्षासाधने नव्हती. ना हेल्मेट, ना सेफ्टी बेल्ट—या निष्काळजीपणामुळे दोन कामगार गंभीर जखमी झाले होते.