Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराड नगरपालिकेत समित्यांची निवड बिनविरोध; पहिल्याच सभेत स्थायीसह विषय समित्यांवर शिक्कामोर्तब

प्रत्येक विषय समितीत दहा सदस्यांची निवड करण्यात आली असून, महिला व बालकल्याण समितीत तब्बल ७५ टक्के महिला सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 03, 2026 | 12:59 PM
कराड नगरपालिकेत समित्यांची निवड बिनविरोध; पहिल्याच सभेत स्थायीसह विषय समित्यांवर शिक्कामोर्तब

कराड नगरपालिकेत समित्यांची निवड बिनविरोध; पहिल्याच सभेत स्थायीसह विषय समित्यांवर शिक्कामोर्तब

Follow Us
Follow Us:

कराड : कराड नगरपालिकेच्या सोमवारी पार पडलेल्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या तीन सदस्यांसह विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. त्यामुळे पालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला वेग येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेच्या सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर होते. सोमवारी सकाळी ११ वाजता सभेला सुरुवात झाली.

समिती सदस्यपदासाठी ११ ते ११.३० या वेळेत अर्ज स्वीकारण्यात आले. दुपारी अर्जांची छाननी झाल्यानंतर एकमेव अर्ज आल्याने सर्व सभापती व सदस्यांच्या निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या. बांधकाम समितीच्या सभापतिपदी अख्तरहुसेन आंबेकरी, पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी अल्ताफ शिकलगार, आरोग्य समितीच्या सभापतिपदी अरुणा पाटील, नियोजन समितीच्या सभापतिपदी आशा मुळे, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी रुपाली माने आणि उपसभापतिपदी किर्तीका गाढवे यांची निवड झाली.

तर स्थायी समितीवर लोकशाही आघाडीकडून ज्येष्ठ नगरसेवक जयवंत पाटील, यशवंत गटाकडून विजयसिंह यादव, तसेच भाजपकडून शिवाजी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव हे स्थायी समितीचे, तर उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे हे शिक्षण समितीचे पदसिद्ध सभापती असल्याचे जाहीर करण्यात आले.

तब्बल ७५ टक्के महिला सदस्यांचा समावेश

प्रत्येक विषय समितीत दहा सदस्यांची निवड करण्यात आली असून, महिला व बालकल्याण समितीत तब्बल ७५ टक्के महिला सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सर्व विषय समित्यांचे सभापती हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असणार आहेत.

नाशिकमध्ये आज ठरणार महापौर

दुसरीकडे, नाशिक महानगरपालिकेत घवघवीत यश संपादन केल्यानंतर आता नाशिककरांना महापौर, उपमहापौर कोण होणार? याची उत्सुकता लागली आहे. गेल्या आठ-दहा दिवसांत भारतीय जनता पक्षात अनेक अंतर्गत हालचाली झाल्या असून, महापौर, उपमहापौरपदी कुणाची वर्णी लागणार याचा निरोप घेऊन मंत्री गिरीश महाजन हे मंगळवारी (दि.३) रोजी सकाळी १०.३० वाजता इंदिरानगर येथील हॉटेल सयाजी येथे दाखल होणार आहेत.

हेदेखील वाचा : Karad News : पालकमंत्री शंभूराज देसाईंनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती; दिले ‘हे’ महत्त्वपूर्ण आदेश

Web Title: Committees elected unopposed in karad municipality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • political news

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
2

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
3

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.