Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : सुनील तटकरे यांच्या नावाने बनावट पत्र, सही अन् शिक्के; राष्ट्रवादीमध्ये जोरदार राजकारण सुरु

राष्ट्रवादी नाशिक गटनेत्या कोण होणार यावरुन राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण झाला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याप्रकरणी खुलासा करावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 03, 2026 | 02:38 PM
Hemlata Patil upset for not giving Municipality group leader post even after ajit pawar promise

Hemlata Patil upset for not giving Municipality group leader post even after ajit pawar promise

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी
  • हेमलता पाटील यांनी अजित पवारांनी शब्द दिल्याचा दावा
  • गटनेते पदावरुन नाशिकमध्ये रंगलं राजकारण
Maharashtra Politics : नाशिक : राज्याचे दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व हे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांकडे आले आहे. सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मात्र राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण याचा निर्णय होणे बाकी आहे. मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये (NCP Politics) अंतर्गत वादाची ठिणगी पडली आहे.

नुकत्याच महापालिका निवडणूका झाल्या होत्या. अद्याप अनेक पालिकांमध्ये महापौर ठरवण्यात आलेला नाही. त्यापूर्वीच अजित पवारांचे निधन झाल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. मात्र अजित पवारांच्या मृत्यूनंतर हेमलता पाटील यांनी त्यांच्यासोबत राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे. “अजित दादांच्या अस्थी विसर्जित होण्यापूर्वीच काहींनी गलीच्छ राजकारण सुरू केलं आहे. सुनील तटकरे यांच्या नावाने कोणी बनावट पत्र, बनावट सही, शिक्के मारून पत्र दिलं का? असा प्रश्न हेमलता पाटील यांनी उपस्थित केला आहे.

हे देखील वाचा : मोठा अनर्थ टळला! मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणाच्या काही क्षण आधीच…

काय म्हणाल्या हेमलता पाटील?

हेमलता पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, “ अजित दादांनी मला शब्द दिलेला असताना, सीमा ठाकरे गटनेत्या कशा झाल्या? प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याप्रकरणी खुलासा करावे आणि मला पुढील आदेश द्यावे. अजित दादांच्या मृत्यू नंतर काही लोक जर एवढं खालच राजकारणं करत असतील तर मला काहीच नको” अशा शब्दांत हेमलता पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त करत भूमिका मांडली आहे.

हेमलता पाटील या मूळच्या काँग्रेसच्या आहेत. विधानसभा निवडणूक निकालानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेश प्रवक्तेपदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, दीड-दोन महिन्यात त्यांनी शिंदे गट सोडला. त्यानंतर हेमलता पाटील यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या 30 ते 35 वर्ष काँग्रेसमध्ये होत्या. त्यांच्याकडे 6 टर्म नगरसेवक पद भूषवण्याचा अनुभव आहे. यंदाची त्यांची सातवी टर्म होती. त्यांना दिवंगत नेते अजित पवारांनी गटनेते बनवण्याचा शब्द दिला असल्याचा दावा हेमलता पाटील यांनी केला आहे.

हे देखील वाचा : दादांच्या अपघातामागे संशयाचा धूर; लिंबू-मिरची उताराः ब्लॅक बॉक्सपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरितच

अजित पवार यांचे अपघाती निधन

दिवंगत नेते अजित पवार यांचा 28 फेब्रुवारी रोजी बुधवारी विमान अपघात झाला. लँडिंगदरम्यान विमान (Learjet 45) धावपट्टीजवळ कोसळले. यामुळे विमानामध्ये तीन स्फोट झाले. विमानाला लागलेल्या आगीमध्ये सर्व प्रवासी आणि विमान जळून खाक झाले. या विमानाचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता.  गुरुवारी बारामतीतील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Hemlata patil upset for not giving municipality group leader post even after ajit pawar promise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • ajit pawar
  • NCP Politics
  • political news

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
3

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
4

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.