दिवाळीच्या सणाच्या उत्साहात मीरा-भाईंदरमधील शाश्वत कॉम्प्लेक्सच्या तरुणांनी इतिहासाला उजाळा देणारी एक आगळीवेगळी कलाकृती साकारली आहे. या तरुणांनी महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असलेला रायगड किल्ला मातीच्या लघुरूपात साकारून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया मानला जातो. याच गडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला होता, आणि त्या ऐतिहासिक क्षणाची झलक आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या तरुणांनी मोठ्या उत्साहाने ही कलाकृती उभी केली आहे.