नालासोपारा (पश्चिम) येथे रेबीजच्या संसर्गामुळे ९ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी समोर आली आहे. कशिश सहानी असे मयत मुलीचे नाव आहे. कशिश सहानी ही नालासोपारा पश्चिमेतील सुबोध सागर इमारतीत आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. ती ‘मदर मेरी’ शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी कशिश ही आजोबांसोबत जात असताना एका भटक्या श्वानाच्या नखामुळे जखमी झाली होती. दुसऱ्या दिवशी तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले होते. मात्र इंजेक्शनच्या भीतीने ती घाबरल्याने उपचार पूर्ण न करता तिला घरी आणण्यात आले.