नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या आंब्याचा सीझन तेजीत सुरू आहे. एपीएमसी बाजारात रोज एक लाखाहून अधिक आंब्यांच्या पेट्या दाखल होत आहेत. त्यातच कोकणातील हापूस आंब्याला मोठी मागणी असते. मात्र, कोकणी हापूसच्या नावाने कर्नाटकी आंबा तर विकला जात नाही ना ? नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात रोज एक लाखहून अधिक आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत. त्यामध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या ६० ते ७० हजार पेट्या येत आहे. तर ३० ते ४० हजार पेट्या कर्नाटक व दक्षिणेतील हापुसदृश्य आंबे दाखल होत आहे. त्यात कर्नाटकच्य्या आंब्यांची आवक देखील वाढत चालली आहे. हे कर्नाटकचे आंबे घाऊक बाजारात आणि बाजाराबाहेरही रत्नागिरी-देवगड हापूस म्हणून विकले जाऊ लागले आहेत. त्यामुळे अस्सल हापूस खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता वाढली आहे.