पनवेल महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग १८ ‘क’ मधील भाजप उमेदवार स्नेहा शेंडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. स्नेहल ढमाले पाटील या भाजपचे विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या बहीण आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच आमदार व खासदारांच्या नातेवाईकांना महानगरपालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला होता. मात्र या भूमिकेनंतरही आमदार विक्रांत पाटील यांनी आपल्या बहिणीला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. परिणामी भाजपच्या अधिकृत उमेदवाराला माघार घ्यावी लागल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे.