Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panvel Municipal Corporation: विकसित महाराष्ट्र २०४७ साठी पनवेल ग्रोथ हब; आमदार प्रशांत ठाकूर यांचे विधानसभेत मत

पनवेलच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावर बोलताना आग्रही भूमिका मांडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या मुद्द्यावरून सरकारचे लक्ष वेधले.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 11, 2026 | 06:12 PM
Panvel Municipal Corporation: विकसित महाराष्ट्र २०४७ साठी पनवेल ग्रोथ हब; आमदार प्रशांत ठाकूर यांचे विधानसभेत मत

Panvel Municipal Corporation: विकसित महाराष्ट्र २०४७ साठी पनवेल ग्रोथ हब; आमदार प्रशांत ठाकूर यांचे विधानसभेत मत

Follow Us
Close
Follow Us:

आ. ठाकूर यांची विधानसभेत आग्रही भूमिका

Panvel Municipal Corporation: पनवेलच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावर बोलताना आग्रही भूमिका मांडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, विमानतळाचे नामकरण, नैना, सिडको, वीज, गरजेपोटी घरे, पाणी पुरवठा, पनवेल बस स्थानक, वीज, पायाभूत सुविधा अशा विविध विषयांचा उहापोह त्यांनी करत या सर्व विषयांवर शासनाचे लक्ष केंद्रित केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा एकमेळ नाही तर विकसित महाराष्ट्राचे लक्ष्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

विकासाच्या दृष्टिकोनातून बोलताना, विमानतळ मेट्रो ८ च्या माध्यमातून मुंबई विमानतळाला जोडले जाणार आहे. मेट्रो २ नवी मुंबई तळोजा खांदेश्वर म्हणजेच पनवेल ते तळोजा जोडला जाणार आहे. उलवे आणि खारघर सागरी मार्ग तसेच तुर्भे खारघर या मार्गानेही विमानतळ आणि परिसर जोडला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैनाच्या बरोबरीने तिसरी मुंबईची उभारणी करण्याची घोषणा केली आहे. आणि त्यामुळे हे परिसर डेव्हलपमेंट सेंटर च्या माध्यमातून उभे राहणार आहे.

यालाच जोडून रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे या परिसरात उभे राहत आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्ग होत असताना पनवेल वसई कॉरिडोर प्रस्तावित केला गेला आहे. याचबरोबरीने या परिसराला मोठे ट्रान्सफर हब विकसित केला जाणार आहे. विमानतळाच्या दृष्टिकोनातून नवीन शहरे केंद्र सुद्धा विकसित होणार आहेत. कि ज्याच्यामध्ये एज्युसिटी, स्पोर्ट्ससिटी, इनोव्हेशन सिटी उभी राहणार आहेत. एकूण विकसित महाराष्ट्र २०४७ महाराष्ट्राचे ग्रोथ हब या क्षेत्रात उभे राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र यांच्या विकसित भारत २०४७ या विश्वासाकडे नेणारा आश्वासित महामार्गाचे हे एका अर्थाने जाळं आहे. विकसित महाराष्ट्र २०४७ महाराष्ट्राचे ग्रोथ हब या क्षेत्रात उभे राहणार आहे. असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी  व्यक्त केला.

आमदार ठाकूर यांनी सभागृहात लक्ष वेधले
२५ डिसेंबर २०२५ पासून विमानतळ कार्यान्वित झाले यामुळे पनवेल आणि परिसराला उर्जितावस्था येणार असल्याचे म्हंटले. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केली गेली आहे. ती सुद्धा आता लवकरात लवकर मान्यता केंद्र सरकारकडून मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न झाले पाहिजेत अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात करत या विषयावर सरकारचे लक्ष वेधले.

Web Title: Panvel municipal corporation panvel growth hub for developed maharashtra 2047 mla prashant thakurs vote in the assembly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • navi Mumbai Airport
  • panvel
  • Panvel Municipal Corporation
  • Vidhan sabha

संबंधित बातम्या

Panvel News: पनवेलमध्ये स्मशानातील राखेचं गूढ अखेर उकललं; नेमकं काय प्रकरण?
1

Panvel News: पनवेलमध्ये स्मशानातील राखेचं गूढ अखेर उकललं; नेमकं काय प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.