नवी मुंबईच्या एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येने नवी मुंबईत खळबळ उडवली आहे. चिचकर यांनी शुक्रवारी स्वतःवर गोळी झाडून आपले जीवन संपवले. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांवर त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता.. या गंभीर आरोपांची दखल घेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले…अधिक चौकशी केली असता यामध्ये दोन पोलीस हवालदारांसह दहा जणांना अटक केली आहे.तर थायलंडसह, परदेशातून या ड्रग्स प्रकरणातील माल मागवत असून मुंबईसह नवी मुंबईमध्ये आणल जात होता. त्यानंतर सर्व ठिकाणी पाठवलं जात होत. तसेच या कारवाईमध्ये २ लाख ७६ हजार ५०० रुपये किमतीचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला आहे. तर ७३ लाख ९३ हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.. या संदर्भात नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.