मावळ तालुक्यातील अजिवली येथे वनसंपदेची निर्घृण कत्तल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेकडो वर्षे जुनी झाडे मुळासकट उखडून टाकत पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.मावळ तालुक्यातील वडगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत अजिवली गावातील गट क्रमांक ४०७ मध्ये अनधिकृत वृक्षतोडीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शेतकरी तानाजी लायगुडे यांच्या मालकीच्या जमिनीत घुसखोरी करून शेकडो झाडे मुळासकट उखडून टाकण्यात आली.या झाडांमध्ये आंबा, चिक्कू, जांभूळ, आईन आणि कोळशी यांसारखी सुमारे शंभर वर्षे जुनी झाडे होती. मात्र कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रस्त्याच्या कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप आहे.तोडलेली झाडे जाळून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे परिसरातील समृद्ध वनसंपदा अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे.या प्रकरणी तानाजी लायगुडे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस, वडगाव मावळ वनपरिक्षेत्र कार्यालय आणि मावळ तहसील कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, ना वन विभागाची परवानगी घेण्यात आली.