पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँ.च्या अंतर्गत गोटात मोठे राजकीय युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक ३२ मध्ये राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार उज्वला ढोरे आणि पराभूत उमेदवार अतुल शितोळे यांच्यातील वाद आता थेट आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे.प्रभाग क्र. ३२ मधील राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार उज्वला ढोरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्या मतदारांना ३ मते भाजपच्या उमेदवारांना द्या आणि १ मत मला द्या असे सांगत क्रॉस व्होटिंगचा प्रचार करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याच प्रभागातील राष्ट्रवादीचे उमेदवार आणि पॅनल प्रमुख अतुल शितोळे यांनी उज्वला ढोरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ढोरे यांनी केलेल्या छुप्या प्रचारामुळे आणि क्रॉस व्होटिंगमुळेच माझा पराभव झाला. बाहेरील पक्षातून आलेल्या आणि जिथे भेळ तिथे खेळ अशी वृत्ती असलेल्या उमेदवारांमुळेच शहरात राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकली नाही असेही शितोळे म्हणालेत. दरम्यान शितोळे यांच्या आरोपांना उज्वला ढोरे यांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे. आपला विजय शितोळे यांच्या जिव्हारी लागल्यानेच ते बिनबुडाचे आरोप करत असल्याचा पलटवार त्यांनी केला. या वादामुळे प्रभागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे.विजयी होऊनही पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागणाऱ्या ढोरे आणि पराभवाचे खापर ढोरेंवर फोडणारे शितोळे यांच्यातील हे युद्ध आगामी काळात कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..