ड्रग्स तस्करी प्रकरणाबाबत काँग्रेस व ठाकरे गटाकडून माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे व निराधार आहेत. माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही. आमच्या शिंदे कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया ठाण्याचे नगरसेवक व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी माध्यमांना दिली. शिंदे पुढे म्हणाले, सावरी येथे ड्रग्स प्रकरण घडले. त्यात अनेक कोटींचा माल जप्त करत काहींना अटक करण्यात आली. याबाबत काँग्रेसचे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही नेते आमच्यावर आरोप करत आहेत. एमडीचा साठा ज्या ठिकाणी सापडला ती जमीन गोविंद शेतकऱ्याच्या मालकीचे आहे. तो कारखाना किंवा जमीन सुद्धा माझ्या मालकीची नाही त्या जमीन व कारखान्याशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्या मालकीच्या कोणत्याही जागेवर पोलिसांनी छापा टाकला नाही, ज्या ठिकाणी छापा टाकला गेला तेथून जमीन तीन किलोमीटर लांब आहे. माझ्या जमिनीचा सातबारा 17/1 या क्रमांकाचा आहे. छापा पडलेल्या जमिनीचा नंबर 4/1 आहे. सुषमा अंधारे यांनी माहिती घेऊन आरोप करावेत. आमची जमीन वडीलोपार्जित असून त्याचा नंबर 30/10 आहे. या जमिनीपासून घडलेली घटना 15 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी कोणतेही फाईव्ह स्टार हॉटेल होणार नाही. कृषी पर्यटन तयार करून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचा माझा मानस व उद्देश आहे. आमची जागा रणजीत शिंदे यांना विकली असून त्याची कागदपत्र आहेत. तो गावात असून कुठेही फरार नाही. पोलिसांच्या चौकशीतून अनेक बाबी सिद्ध झाले आहेत. राजकीय दोषापोटी आमच्यावर आरोप केले जात आहेत. आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचे काम सुरू असून असे करणाऱ्या कायदेशीर नोटीस बजावणार आहे. आरोप मागे न घेतल्यास अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. या प्रकरणात ज्यांना अटक केली आहे त्यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच इतर आरोपींना ही अटक करा अशी मी मागणी करतो.