Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेशिस्त ऊस वाहतूकदारांवर कारवाईचा बडगा; पोलीस ‘या’ गोष्टींची करणार तपासणी

ऊस वाहतूक करणार्‍या १२ ते १३ ट्रॅक्टरवर भिगवण पोलिसांकडून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 18, 2025 | 01:34 PM
बेशिस्त ऊस वाहतूकदारांवर कारवाईचा बडगा; पोलीस 'या' गोष्टींची करणार तपासणी

बेशिस्त ऊस वाहतूकदारांवर कारवाईचा बडगा; पोलीस 'या' गोष्टींची करणार तपासणी

Follow Us
Close
Follow Us:
  • बेशिस्त ऊस वाहतूकदारांवर कारवाईचा बडगा
  • १३ ट्रॅक्टरवर भिगवण पोलिसांकडून कारवाई
  • पोलीस ‘या’ गोष्टींची करणार तपासणी
भिगवण : बेशिस्तपणे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करून ऊस वाहतूक करणार्‍या १२ ते १३ ट्रॅक्टरवर भिगवण पोलिसांकडून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली. ऊस वाहतूक सुरू झाल्यापासून सहा ते सात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऊस वाहतूकदारांना वेळोवेळी सूचना करून देखील त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य होत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचे विनोद महांगडे यांनी सांगितले. ऊस वाहतूकदारांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ही कारवाई यापुढेही कोणत्याही दबावाला बळी न पडता चालू ठेवण्यात यावी, अशी देखील अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

बेशिस्त वाहन चालकांवर गुन्हा दाखल करणार

भिगवण ते शेटफळगढे या रस्त्यावर ट्रॅक्टर वाहतूक चालकांना शिस्त लावण्यासाठी भिगवण पोलिसांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. मदनवाडी येथील घाटात बारा ते तेरा ट्रॅक्टरवर कारवाई केलीच; पण अन्य ट्रॅक्टर वाहतुकीवर नियंत्रण देखील करणार आहेत. वाहतुकीचे सर्व नियम पाळत वाहन चालवणे बंधनकारक आहे. बेशिस्तपणे वाहन चालवत आढळल्यास त्याच्यावरती दंडात्मक तसेच कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे महांगडे यांनी सांगितले आहे.

भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महांगडे, पोलीस उपनिरीक्षक खाडे, महेश उगले, गणेश करचे, पोलीस हवालदार सूर्यवंशी, साबळे, महिला पोलीस हवालदार भोंग, पोलीस कॉ पवार, आप्पा भांडवलकर या कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.

या गोष्टींची होणार तपासणी

चालकांना चारित्र्य प्रमाणपत्र कार्यालयात जमा करणे, वाहनाचा विमा, परवाना, आधारकार्ड आदी कागदपत्रे सोबत ठेवणे, दारू पिऊन वाहन न चालविणे, तसेच वाहन बिघाड झाल्यास मार्गाच्या कडेला थांबवून टायरला स्टॉपर लावणे अशा महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. चालत्या वाहनांवर मोठ्या आवाजात गाणी वाजवू नयेत आणि गरज भासल्यास डायल 112 वर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय वाहतूक सुरक्षिततेसाठी वाहनांच्या पुढील व मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे, त्यावर कारखान्याचे नाव, चालकाचा संपर्क क्रमांक आणि रक्तगट नमूद करणे. तसेच चालकांनी रिफ्लेक्टर जॅकेटचा वापर करावा, असेही निर्देश देण्यात आले.

Web Title: Police are taking action against those transporting sugarcane in an undisciplined manner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 01:33 PM

Topics:  

  • Bhigwan
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

पुण्यात बंडू आंदेकरच्या वकिलांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
1

पुण्यात बंडू आंदेकरच्या वकिलांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

सातारा ड्रग्ज प्रकरणावरून राजकारण तापलं; हर्षवर्धन सपकाळांनी केले गंभीर आरोप
2

सातारा ड्रग्ज प्रकरणावरून राजकारण तापलं; हर्षवर्धन सपकाळांनी केले गंभीर आरोप

चंद्रपुरातील किडनी प्रकरण समोर येताच पोलिसांकडून मोठी कारवाई; सहा जणांवर गुन्हा दाखल करून…
3

चंद्रपुरातील किडनी प्रकरण समोर येताच पोलिसांकडून मोठी कारवाई; सहा जणांवर गुन्हा दाखल करून…

पाचगणीमध्ये पाच लाखांचा अमली पदार्थ जप्त; पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत दहा जण ताब्यात
4

पाचगणीमध्ये पाच लाखांचा अमली पदार्थ जप्त; पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत दहा जण ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.