राज्यातील लोककलांचे संवर्धन, शेतकऱ्यांचे हित, एसटी सेवा, चेकपोस्टवरील भ्रष्टाचार आणि येत्या 2026 निवडणुकांवरील स्पष्ट अशा अनेक मुद्द्यांवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर उत्तरं दिली.सरकारच्या लोकप्रिय योजनांवर बोलताना सरनाईक म्हणाले, राज्य सरकार सक्षम आहे. यापूर्वीच्या सरकारांनी जी कामं केली नाहीत, ती आम्ही करून दाखवत आहोत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 237 आमदारांसह आम्ही स्थिर आणि सक्षम सरकार देत आहोत. राज्याच्या कर्जासंदर्भात त्यांनी जनतेला आश्वस्त करताना सांगितले की, “कर्जाची कुणीही चिंता करू नका. राज्य सरकार कर्ज फेडण्यास सक्षम आहे.” राज्यातील कला केंद्रांबाबत स्पष्ट भूमिका घेत सरनाईक म्हणाले, महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवणे हे आमचं कर्तव्य आहे. मात्र, जर संस्कृतीच्या नावाखाली कुठेही वेश्याव्यवसाय चालू असेल, तर तो थांबवणं हे आमचं नैतिक कर्तव्य आहे. या संदर्भात संबंधित एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना आजच आदेश दिले आहेत. एसटीच्या तक्रारींवर बोलताना ते म्हणाले, एसटी ही एसटी पर्यंतच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. प्रवासी उभे असताना जर गाड्या ब्रिजवरून नेत असतील, तर अशांवर कारवाई करावी, असा मी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिला आहे. सरनाईक यांनी नांदणी चेकपोस्टची पाहणी केल्याचे सांगत, “त्या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमध्ये 25 अधिकारी असल्याचा संशय आहे. याबाबत मी लेखी अहवाल मागवला आहे.” शासनाचं धोरण चेकपोस्ट बंद करण्याचं असून, कुठे गैरप्रकार घडत असतील तर त्वरित कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.