महाराष्ट्र शासनाने नागपूर ते गोवा या प्रस्तावित केलेल्या शक्तिपीठ महामार्गाला मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा महामार्ग तात्काळ रद्द करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांची हजारो हेक्टर सुपीक कृषी जमीन जाणार आहे. ती बिगरशेती जमीन होईल. त्यामुळे हा अनावश्यक शक्तिपीठ महामार्ग तात्काळ रद्द करण्याची मागणी यांनी यावेळी केली.