
मदतकार्यास गेलेल्या पोलिसाचा मृत्यू
तत्काळ खातरजमा करून मदतकार्य पोहोचवण्यासाठी हातखंबा वाहतूक केंद्राचे पोलीस अंमलदार संतोष गायकवाड आणि पोलिस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे हे आपली शासकीय बोलेरो जीप (क्र. एम एच ०८, बीई-३५६१) घेऊन अंजनारीच्या दिशेने रवाना झाले होते. अंजनारी नदीजवळ पोहोचली असतानाच, त्याच दरम्यान पाठीमागून गोव्याच्या दिशेने लोखंडी सळ्या भरून जाणारा एक भरधाव अवजड कंटेनर तिथे आला. ट्रेलर चालकाने रस्त्याची बिकट परिस्थिती आणि तिथला तीन उतार अजिबात लक्षात घेतला नाही, शिवाय अत्यंत निष्काळजीपणे व हयगयीने वाहन चालवत त्याने पोलिसांच्या बोलेरो गाडीला अशी काही जोरदार धडक दिली की दोन्ही वाहने नियंत्रणाबाहेर गेली.
आता फेब्रुवारी महिन्याची गरज नाही! ४ महीने आधीच ‘हापूस’ची मार्केटमध्ये एन्ट्री; तब्बल २१ हजार…
कंटेनरवी घड़क इतकी जबरदस्त होती की, पोलिसांची बोलेरो जीप रस्त्यावरून सरळ फेकून दिली जाऊन तब्बल १०० फूट खोल दरीत जाऊन कोसळली, तर ती भरधाव कंटेनरसुद्धा चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे खोल दरीत जाऊन पलटी झाला, या भीषण अपघातात बोलेरो गाडीचा पूर्णपणे चुराडा झाला. या दुर्दैवी अपघातात गभीर जखमी झालेले हातखंबा वाहतूक केंद्राचे पोलिस अंमलदार संतोष आमासाहेब गायकवाड यांचा सनागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर कंटेनर चालक मदन हेम सिंग आणि त्याचा सहकारी क्लिनर हे दोघे जागीच ठार झाले.
अशा या अतिशय गंभीर व जीवघेण्या परिस्थितीतही दरीत पडलेल्या जखमी पोलिस कॉन्स्टेबल अनिल शिगाडे यानी प्रसंगावधान राखून स्वतः लांजा पोलिस ठाण्याला फोन करून या अपघाताची तत्काळ माहिती दिली, माहिती मिळताब लाजा पोलिस व हातखंबा पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रात्रीच्या वेळी अथक प्रयत्न करून गाडीत अडकलेल्या दोन्ही कर्मचा-यांना बाहेर काढून उपचारासाठी पाली ग्रामीण रुग्णालयात पाठवले, जिथून त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले होते.
Ans: भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने पोलिसांच्या गाडीला अंजनारी नदीच्या परिसरात धडक दिली.
Ans: कंटेनरने धडक दिल्याने पोलिसांची जीप 100 फूट खोल दरीत कोसळली.