मागील काही दिवसांपासून संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढायला सुरुवात केली आहे.जालना रोड आणि पडेगाव रोड वरील अतिक्रमण काढल्यानंतर आता जळगाव रोडवरील अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आहे. शहरातील दिल्ली गेट येथे महानगरपालिकेची कारवाई सुरू असताना मोठ्या प्रमाणात नागरिकांनी जमाव केला होता थोड्याफार प्रमाणात अतिक्रमणला विरोध सुद्धा पाहायला मिळाला मात्र महानगरपालिकेने आणि पोलीस प्रशासनाने समजून सांगितल्यानंतर पुन्हा जेसीबी द्वारे घरांवर आणि दुकानावर कारवाई सुरू करण्यात आली.यामधे महानगरपालिकेच्या ३५० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तर पोलीस विभागाचे २५० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.या कारवाईसाठी २५ जेसीबी, ५ पोकलॅन,१५ टिप्पर, २ रूग्णवाहिका, २ कोंडवाडा वाहने,२ अग्निशमन बंब चा वापर करण्यात आला आहे.