शूटिंग बॉल वर्ल्ड कप स्पर्धेसाठी माळशिरस येथे झालेल्या निवड चाचणी मध्ये सांगलीतील प्राजक्ता संजय आवळे या मुलीची वर्ल्ड कप साठीच्या भारतीय शूटिंग बॉल संघात निवड झाली. 1 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या शूटिंग बॉल वर्ल्ड कप मध्ये ती सहभागी होणार आहे. दरम्यान मुलींनी खेळात उतरलं पाहिजे खेळामुळे भविष्यात अनेक संधी मिळत आहेत. या मिळालेल्या संधीचे सोने करीन. शाळेने आणि पालकांनी दिलेल्या साथीमुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले अशी प्रतिक्रिया प्राजक्ता आवळे हिने नवराष्ट्र शी बोलताना व्यक्त केली आहे. तर जेव्हा तिला मी खेळताना पाहीन तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा असेल. आम्ही तिच्याकडे मुलगी म्हणून पाहत नाही तर ती आमच्यासाठी मुलगाच आहे असे आम्ही मानतो. अशी प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी संजय आवळे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान तिने असेच खेळत राहावे देशासाठी ती खेळणार आहे याचा आम्हाला अभिमान आहे. सकाळी सहा वाजल्यापासून मी तिचा सराव घेतो. तिच्या सरावामुळेच ती आज या ठिकाणी पोहोचली आहे.