Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

”जुल्मी सारीपाटावर स्वत:ला उभं करावं लागलं..”, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसाठी किरण मानेंनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले…

अजित पवारांच्या निधनाच्या तीन दिवसांनंतर लगेच सुनेत्री पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशातच आता सुनेत्रा पवारांसाठी मराठी अभिनेता किरण माने यांनी पोस्ट शेअर केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 01, 2026 | 04:44 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या या निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.यानंतर घटनेनंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या निधनाच्या तीन दिवसांनंतर लगेच सुनेत्री पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी नंतर अनेकांनी याबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता सुनेत्रा पवारांसाठी मराठी अभिनेता किरण माने यांनी पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. पोस्ट शेअर करत म्हणाले,…”सगळा महाराष्ट्र राजकारणाचा क्रूर, हिंस्त्र आणि निर्दयी खेळ बघतोय. अर्थात हा काळ यावाच लागतो. महाराष्ट्रातल्या बहुजनांना ही नीच विचारसरणी समजून त्यांचे डोळे उघडेपर्यन्त याहून अनेक खुनशी, रक्तरंजीत घटनांचे साक्षीदार आपल्याला व्हायचे आहे. असो….सुनेत्रावहिनींनी आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना मी जेवढे पाहिले आहे तेवढ्या प्रसंगात अतिशय संवेदनशील, मायाळू आणि पर्यावरणावर प्रेम असलेलं व्यक्तीमत्त्व मला दिसलं. तीन वर्षांपुर्वी त्यांनी स्वत: फोन करून मला त्यांच्या एनव्हायरलमेन्टल फोरमच्या वर्धापनदिनादिवशी प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केलं होतं.”

जुळ्या बाळांना भेटण्यासाठी रामचरण रुग्णालयात दाखल, चाहते झाले वेडे! धक्काबुक्की अन्…Video Viral

”त्याआधी मला अजितदादांच्या पत्नी याव्यतिरीक्त एक व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल फारशी ओळख नव्हती. …तिथं गेल्यावर मला समजलं की सुनेत्रावहिनींनी बारामतीमध्ये एनव्हायरमेन्टल फोरमच्या माध्यमातनं पर्यावरणविषयक जागृतीचं अफाट काम केलंय ! एखाद्या राजकीय नेत्याच्या कुटूंबियांनी पदाचा, अधिकारांचा, आर्थिक सबलतेचा, जनाधाराचा, सामाजिक प्रतिष्ठेचा वापर समाजोपयोगी कामांसाठी कसा करावा, याचं उत्तम उदाहरण पाहिलं मी.कार्यक्रमादिवशी संवाद साधताना वहिनींचा निसर्ग, प्राणी, पक्षी, झाडं यावरचा सखोल अभ्यास पाहुन मी अक्षरश: थक्क झालो. पर्यावरणशास्त्र, हवामानबदल, प्रदुषण, प्राणी-पक्षी याबद्दल सर्वांमध्ये, विशेषत: लहान मुलांमध्ये अवेअरनेस यावा यासाठी त्यांनी अथक परीश्रम घेतलेले दिसुन आले. हल्ली मोबाईल गेम्समध्ये अडकलेल्या लहान मुलांना खुल्या मैदानात आणून लगोरी, सूरपारंब्या, गोट्या, विटीदांडू अशा अनेक लुप्त होत चाललेल्या खेळांच्या स्पर्धाही त्या भरवतात हे समजले. आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीत खूप मोलाचं काम त्या करतात हे पाहून भारावून गेलो.”

30 कोटींच्या फसवणूक प्रकरणात विक्रम भट्ट अडचणीत; पत्नीसमवेत जामीन अर्ज फेटाळला
पुढे ते म्हणाले, ”आज त्या दु:खातून सावरल्याही नाहीत, तोवर त्यांना या राजकारणाच्या जुल्मी सारीपाटावर स्वत:ला उभं करावं लागलं. अर्थात यामागचं गूढ राजकारण न समजण्याइतक्या त्या कमकुवत नाहीत. ‘जवळचे आणि दूरचे’ ओळखून त्या या सगळ्याला समर्थपणे तोंड देतील हा विश्वास आहे. उपमुख्यमंत्रीपद हे संवैधानिक नाही, त्यामुळे मिडीयानं पसरवलेलं ‘पहिल्या महिला उपमुख्यमंत्री’ वगैरे बिरूद मला फार महत्त्वाचं वाटत नाही. त्याहून जास्त पतीच्या निधनाचं दु:ख बाजूला ठेवून त्यांची अपुर्ण स्वप्नं पुर्ण करण्यासाठी काटेरी सिंहासन निवडणारी खंबीर भगिनी म्हणून त्यांचा अभिमान आहे.” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

Web Title: Kiran mane expresses his feelings about deputy cm sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Kiran Mane
  • Marathi News
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.