Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : जिल्हा परिषद निवडणुकीची पुरंदर तालुक्यात रणधुमाळी ; बंडखोरी, पक्षांतरांनी ढवळली राजकीय समीकरणं

तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीने अक्षरशः सत्तेची रणधुमाळी उडवली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 01, 2026 | 04:09 PM
Pune News : जिल्हा परिषद निवडणुकीची पुरंदर तालुक्यात रणधुमाळी ; बंडखोरी, पक्षांतरांनी ढवळली राजकीय समीकरणं
Follow Us
Follow Us:
  • जिल्हा परिषद निवडणुकीची पुरंदर तालुक्यात रणधुमाळी
  • बंडखोरी, पक्षांतरांनी ढवळली राजकीय समीकरणं
पुणे : तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीने अक्षरशः सत्तेची रणधुमाळी उडवली आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांच्यातील थेट संघर्षासोबतच बंडखोरी, नाराजी आणि पक्षांतरांमुळे राजकीय समीकरणे पूर्णतः ढवळून निघाली आहेत. प्रत्येक गटात लढत अटीतटीची बनली असून, तालुक्याचे राजकारण तापले आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या गराडे गटात तिरंगी लढतीने वातावरण चांगलेच तापले आहे.

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने येथे प्रतिष्ठा पणाला लावली असून प्रचारात आरोप-प्रत्यारोपांना धार चढली आहे. गराडे आणि दिवे गणातही तिन्ही प्रमुख पक्ष आमनेसामने उभे ठाकल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वीर गटात मात्र यंदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला.

बुलढाणा येथे राज्यस्तरीय शालेय शुटिंगबॉल स्पर्धांचे आयोजन! जिल्हा क्रीडा संकुलात पार पडणार

उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले तालुकाध्यक्ष हरिभाऊ लोळे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करत अधिकृत उमेदवारी मिळवली. या एका निर्णयामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून वीर गटात पंचरंगी लढत उभी राहिली आहे. भिवडी व वीर गणात अनेक उमेदवार रिंगणात असल्याने मतविभाजन कोणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.बेलसर, माळशिरस आणि निरा परिसरातही राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे.

माळशिरस गणात प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्याने बहुरंगी लढत रंगली आहे. बेलसर गटात उमेदवारी नाकारल्यानंतर झालेल्या पक्षांतरांमुळे पारंपरिक गणिते मोडीत, सत्तेच्या वर्चस्वाची लढाई एकूणच पुरंदर तालुक्यातील ही निवडणूक केवळ जागांची नाही, तर सत्तेच्या वर्चस्वाची बनली आहे. बंडखोरी आणि पक्षांतरांनी पारंपरिक राजकीय गणिते मोडीत निघाली असून, या रणधुमाळीचा निकाल मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादीला फटका बसल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित गावे या भागात येत असल्याने विकास, पुनर्वसन आणि भरपाईचे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी आले आहेत.निरा-कोळविहिरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात चौरंगी लढत होत आहे. निरा-शिवतक्रार व कोळविहिरे गणातही प्रत्येक मत निर्णायक ठरण्याची शक्यता असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

Pune ZP Election 2026 : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय घराणी केंद्रस्थानी; नातेसंबंधातून उमेदवारीचा प्रभाव

Web Title: Pune news zilla parishad elections in purandar taluka rebellions defections disrupt political equations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Marathi News
  • pune news
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
1

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
2

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
3

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे
4

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.