Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : ‘नमामी मुळा-मुठा’, नदी स्वच्छतेसाठी पाऊल; राज्य नौदल प्रशिक्षण अकादमीचा रौप्यमहोत्सव

देशातील सर्व नद्यांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करत असलेल्या भारत सरकारकडून पुण्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मुळा-मुठा नदीच्या प्रदूषणावर लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 01, 2026 | 04:37 PM
Pune News : ‘नमामी मुळा-मुठा’, नदी स्वच्छतेसाठी पाऊल; राज्य नौदल प्रशिक्षण अकादमीचा रौप्यमहोत्सव
Follow Us
Follow Us:
  • नदी स्वच्छतेसाठी पाऊल
  • राज्य नौदल प्रशिक्षण अकादमीचा रौप्यमहोत्सव
पुणे : देशातील सर्व नद्यांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करत असलेल्या भारत सरकारकडून पुण्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मुळा-मुठा नदीच्या प्रदूषणावर लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत. ‘नमामी गंगा’च्या धर्तीवर ‘नमामी मुळा-मुठा’ अशी योजना राबवून नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी यांनी दिली.एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठांतर्गत महाराष्ट्र नौदल शिक्षण व प्रशिक्षण अकादमी (मॅनेट) च्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र. कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, सायली गणकर,कुलसचिव डॉ. महेश चोपडे आदी उपस्थित होते.

चौधरी म्हणाले की, प्रक्रिया न करता नदीत सोडले जाणारे सांडपाणी आणि थेट नदीपात्रात टाकला जाणारा कचरा ही गंभीर समस्या बनली आहे. यामुळे पुण्यातील भूजल पातळी, शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून भविष्यात ही समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.त्यामुळे केंद्र सरकारकडून सर्वंकष नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे.या प्रकल्पांतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढविणे, अवैध सांडपाणीच्या जोडण्या तोडणे, तसेच औद्योगिक प्रदूषणावर कठोर कारवाई केली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलगुणवत्ता तपासणीसाठी नियमित निरीक्षण यंत्रणा उभारली जाईल. तसेच नदीकाठावरील गावांकडून कचरा नदीपात्रात टाकला जाऊ नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधला जाणार आहे.

Baramati Airport plane Crash History: बारामती विमानतळ अपघातांचा भयावह इतिहास; आधीचे प्लेन क्रॅश अहवाल गुलदस्त्यात!

मुळा-मुठा ही केवळ पाण्याचा स्रोत नसून सांस्कृतिक व पर्यावरणीय वारसा असल्याचे नमूद करत चौधरी यांनी नदी संवर्धनासाठी नागरिकांच्या सहभागालाही तेवढेच महत्त्व असल्याचे सांगितले. शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि युवकांच्या सहकार्याने व्यापक जनजागृती मोहीम राबवून “स्वच्छ नदी, सुरक्षित भविष्य” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे.

प्रशासनाशी पत्रव्यवहार, उपाययोजनांची मागणी
मुळा-मुठा नदीचे वाढते प्रदूषण आणि नदीपात्रात टाकला जाणारा कचरा या गंभीर प्रश्नांकडे एमआयटी एडीटी विद्यापीठाने सातत्याने लक्ष वेधले आहे. राज्य, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी पत्रव्यवहार करून उपाययोजनांची मागणी केली आहे. पुण्याच्या जीवनवाहिनीच्या संरक्षणासाठी सरकारला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची विद्यापीठाची भूमिका आहे. असे कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी सांगितले.

पुणे शहरातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश; जाणून घ्या निरिक्षकांची सविस्तर नावे

 

Web Title: Pune news steps taken for river cleanliness silver jubilee of state naval training academy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Marathi News
  • pune news

संबंधित बातम्या

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
1

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
2

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा
3

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?
4

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.