सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका गणपती पंचायतन संस्था आणि कृष्णामाई महोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने आज महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त सांगलीत कृष्णा नदी आणि घाटावरील स्वच्छता करण्यासाठी महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. या महास्वच्छता अभियानामध्ये नागरिक सामाजिक कार्यकर्ते कृष्णामाई चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी नव कृष्णा व्हॅली स्कूलचे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होत दरम्यान कृष्णा नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली असून त्या संदर्भामध्ये आढावा घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याचे आणि जल, जंगल, जमीन वाचवण्यासाठी प्रत्येकाने हिरीरीने सहभागी होत आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे महानगरपालिका प्रशासनही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त संगीता महापात्र यांनी नवराष्ट्र शी बोलताना व्यक्त केली. तर कृष्णामाईची स्वच्छता होणे ही काळाची गरज असल्याचं आणि आपली जीवन वाहिनी असणारी नदी याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. पुण्या मुंबईसारख्या शहरात नद्यां नाल्यांमध्ये रूपांतरित झाल्या असून तशी अवस्था कृष्णा नदी बाबत होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी नदी संवर्धनासाठी आपले योगदान दिले पाहिजे अशी प्रतिक्रिया कृष्णामाई महोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट चे सर्वेसर्वा महेंद्र चंदाले यांनी व्यक्त केली.