सांगली ही नाट्य पंढरी सहकार पंढरी आणि आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते परंतु हल्ली या सांगलीची ओळख ही गुन्हेगारी क्षेत्रात वाढत चालली आहे. रोज दिवसाढवळ्या खून मारामाऱ्या दरोडे होताना दिसत आहेत. अमली पदार्थांची राजरोसपणे विक्री आणि खरेदी होत आहे.त्यामुळे सांगलीची खरी ओळख पाठीमागे पडत आहे. सांगलीचा बिहार होऊ देऊ नका अशा संतप्त प्रतिक्रिया सांगलीकरांनी व्यक्त केल्या आहेत.पालकमंत्र्यांसह पोलीस अधीक्षकांनी या विरोधात ॲक्शन प्लॅन तयार करावा,कॉम्बिन ऑपरेशन राबावेत.सरकारने यामध्ये लक्ष घालून सांगलीचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्यावे यासाठी आज लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील मारुती चौकात नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात आली. ज्येष्ठ नागरिक महाविद्यालयीन तरुण-तरुणी, महिला यांनी सहभागी होत चांगला प्रतिसाद दिला. या मोहिमेच्या माध्यमातून . मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांना निवेदन पाठवले जाणार असून सांगलीतील गुन्हेगारी त्याचबरोबर अमली पदार्थांची विक्री यावर ताबडतोब आळा घालण्यात यावा अशी मागणी ही सांगलीकर नागरिकांनी केली आहे .
.