पावसाने धरलेला जोर आणि कोयनेसह इतर धरणातून होणारा मोठ्या प्रमाणात विसर्ग यामुळे सांगली कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 43.7 फूट इतकी वाढ झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने तसेच कोयने मधून होणारा विसर्ग थांबवल्याने आज सांगलीतील आयुर्विन पूलाखाली पाण्याची पातळी 24 फुटावर येऊन पोहोचली असल्याने महापुराचा संभाव्य धोका टळलेला आहे. सांगलीतील ज्या ज्या नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलेले होते अशा नागरी वस्त्यांमध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जोरदार स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये साचलेला गाळ, कचरा काढून त्या ठिकाणी औषध फवारणी करण्याचे काम जोमाने सुरू आहे. निवारा केंद्रांमध्ये गेलेले नागरिक पुन्हा आपापल्या घराकडे परतले असून त्यांनीही आपल्या घराची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे.
.