Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव; गावकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली अभयारण्य परिसरातील शिराळा तालुक्यासह लगतच्या गावांमध्ये वन्य प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 06, 2026 | 01:34 PM
Sangali  News : वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव; गावकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Follow Us
Follow Us:
  • वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव
  • गावकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सांगली : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली अभयारण्य परिसरातील शिराळा तालुक्यासह लगतच्या गावांमध्ये वन्य प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. गवे, रानडुक्कर, माकडे, मोर तसेच बिबट्यांमुळे शेतकऱ्यांची पिके उद्धवस्त होत असून मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वन्य प्राणी हल्ला प्रतिबंध व शेतकरी संरक्षण जनचळवळीचे तानाजी सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली अभयारण्याच्या परिसरातील अनेक गावांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गवे, रानडुक्कर व माकडांच्या कळपांमुळे शेतकऱ्यांची भात, ज्वारी, भुईमूग, मका, ऊस तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकरी वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक एका रात्रीत नष्ट होत असल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

काही ठिकाणी वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनाही घडल्या असून त्यामुळे गावागावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीत वन विभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नाराजी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी अधिकारी येतात, मात्र नुकसानभरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच बिकट होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शासन व वन विभागाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला आहे. यावेळी कादर नाईकवडी, श्रीधर करडे, संग्राम पाटणकर, प्रकाश साळुंखे, प्रकाश माळी, सुजित पवार, अमित पाटील, सागर कोळेकर, रोहित घुबडे, अमर औरादे व तीफिक गुराडी उपस्थित होते.

Kolhapur News : वाहतूक संघटनांचा एल्गार; ‘ई-चलनाविरोधात आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा

काय आहेत गावकऱ्यांच्या मागण्या ?

जनचळवळीच्या वतीने शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास किमान पंचवीस लाख रुपये तत्काळ भरपाई देण्यात यावी.
जखमी झालेल्या व्यक्तीस पाच लाख रुपयांची मदत द्यावी. शेतीच्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून शंभर टक्के नुकसानभरपाई तीस दिवसांच्या आत देण्यात यावी.
वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पथके नियुक्त करून पिंजरे लावणे, सातत्याने गस्त ठेवणे तसेच गावांच्या संरक्षणासाठी कुंपणाची व्यवस्था करावी.
शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सूर्यऊर्जेवर चालणाऱ्या कुंपण योजनेस शंभर टक्के अनुदान द्यावे.
प्रभावित गावांमध्ये वन विभागाने तातडीने बैठका घेऊन ठोस निर्णय घ्यावेत,अशा मागण्या गावकऱ्यांनी केल्या आहेत.

Kolhapur Heat: महाराष्ट्र होरपळला! कोल्हापुरात पारा ३४.९ अंशांवर, तर विदर्भात ‘हीट वेव्ह’चा इशारा

Web Title: The issue of safety of farmers in the sahyadri tiger reserve area in sangli is on the agenda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Sangali News

संबंधित बातम्या

Jalgaon News: गैरवर्तन पडलं महागात! पोलिस अधीक्षकांनी उचललं कठोर पाऊल
1

Jalgaon News: गैरवर्तन पडलं महागात! पोलिस अधीक्षकांनी उचललं कठोर पाऊल

Thane News: ‘मृत्यूच्या दारातून परतला’ 52 वर्षीय मालाडकराला ठाण्यातील डॉक्टरांनी दिलं नवजीवन
2

Thane News: ‘मृत्यूच्या दारातून परतला’ 52 वर्षीय मालाडकराला ठाण्यातील डॉक्टरांनी दिलं नवजीवन

Maharashtra News: वंचित आघाडीचा रास्ता रोको, पोलिसांकडून आंदोलनकर्ते ताब्यात
3

Maharashtra News: वंचित आघाडीचा रास्ता रोको, पोलिसांकडून आंदोलनकर्ते ताब्यात

Jalgaon:  शिवशाही पुन्हा जळाली! चालकाच्या सतर्कतेमुळे बचावले ‘इतके’ प्रवासी
4

Jalgaon: शिवशाही पुन्हा जळाली! चालकाच्या सतर्कतेमुळे बचावले ‘इतके’ प्रवासी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.