सातारा – साताऱ्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे लक्ष्मी टेकडी भागात अनेक घरांचं मोठं नुकसान झालं आहे. काही कुटुंबाची पत्र्यांची घर उडून गेली आहेत. त्यामुळे संसार उघड्यावर पडले आहेत. घरगुती साहित्याबरोबर शैक्षणिक साहित्य देखील या पावसात भिजून गेले आहे. प्रशासनाने रात्री उशिरा या भागाला भेट देऊन पाहणी केली असली तरी अद्याप कोणतीही मदत या लोकांना मिळालेली नाही. जवळजवळ 30 ते 40 घरांचं नुकसान या वादळी पावसाने झाल आहे. अनेक घरांवर झाडं आणि विद्युत पोल कोसळले आहेत. त्यामुळे या लोकांना तात्काळ मदत मिळण्याची मागणी होते आहे.